मंगेश पांडे, पिंपरीशिकाऊ वाहन परवाना (लर्निंग लायसन्स) मिळविण्यासाठी रांगेत तासन् तास उभे राहणे, नंबर न लागल्यास दिवस वाया जाणे, दलालांचा पडणारा गराडा, आर्थिक भुर्दंड अन् यामुळे होणारा मन:स्ताप आता कमी झाला आहे. चिखली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ‘आॅनलाइन अपॉर्इंटमेंट फॉर लर्निंग लायसन्स’ ही सुविधा सुरूकेली आहे. या सुविधेमुळे शिकाऊ परवान्यासाठी घरबसल्या वेळ घेऊन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्यास काही तासांतच परवाना हातात मिळणार आहे.परवान्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अनेक अडचणी येतात. तो मिळविण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा यामुळे तो मिळविणे म्हणजे आव्हानच समजले जाते. त्यातच कार्यालयात पोहचण्याआधीच दलालांचा पडणाऱ्या गराड्यामुळे संबंधित व्यक्ती कार्यालयात पोहोचण्याआधीच कोंडीत सापडते. आरटीओ कार्यालय म्हटले की नागरिकांपेक्षा दलालांचीच संख्या अधिक असते. परवाना असो की अन्य कोणतेही काम दलालांचा मोठा हस्तक्षेप असतो. रितसर प्रक्रियेपेक्षा दलालांकडून त्वरीत कामे होतात अशी नागरिकांची समज आहे. मात्र, यामुळे गैरप्रकार वाढीस लागत आहेत. याला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड (चिखली) उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘आॅनलाईन लर्निंग अपॉर्इंमेंट‘ सुविधा सुरु केली आहे. अपॉईमेंट घेण्यासाठीचे अर्ज आरटीओच्या ६६६.२ं१ं३ँ्र.ल्ल्रू.्रल्ल संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यात नाव, पत्ता, अपॉईमेंटची तारीख, वेळ नमूद करुन आॅनलाईन अर्ज जमा करायचा. अपॉईमेंट घेण्याच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरता येतील. अपॉइमेंट अर्जाची एक प्रत घेतल्यानंतर अर्जावर नमूद केलेल्या तारिख व वेळेला कार्यालयात जायचे. अर्जाची प्रत, निवासाचा पुरावा, छायाचित्र आदी कागदपत्रे ३१ रुपयांसह आरटीओ कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायची. त्यानंतर २० गुणांची आॅनलाईन परिक्षा घेतली जाईल. २० पैकी १२ गुण मिळविल्यानंतर संबंधित व्यक्तीला लगेचच शिकाऊ वाहन परवाना मिळेल. ही सुविधा नव्याने परवाना घेणाऱ्यानाच उपलब्ध आहे. या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून काही तासातच शिकाऊ वाहन परवाना हातात मिळणार आहे.
परवान्यासाठी घरबसल्या ‘अपॉर्इंटमेंट’ !
By admin | Updated: September 22, 2014 05:55 IST
शिकाऊ वाहन परवाना (लर्निंग लायसन्स) मिळविण्यासाठी रांगेत तासन् तास उभे राहणे, नंबर न लागल्यास दिवस वाया जाणे, दलालांचा पडणारा
परवान्यासाठी घरबसल्या ‘अपॉर्इंटमेंट’ !
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}