Anti Corruption Bureau: पिंपरी महापालिकेच्या कर्मचा-यांना ८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 21:08 IST2021-12-17T21:08:03+5:302021-12-17T21:08:17+5:30
महापालिकेच्या कर संकलन विभागातील दोन कर्मचा-यांना शुक्रवारी सायकाळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

Anti Corruption Bureau: पिंपरी महापालिकेच्या कर्मचा-यांना ८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला
पिंपरी : महापालिकेच्या कर संकलन विभागातील दोन कर्मचा-यांना शुक्रवारी सायकाळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महापालिकेच्या कर संकलन विभागातील एक मुख्य लिपीक आणि दुसरा लिपीक यांनी मिळकत नोंदणीसाठी लाच मागितली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सायंकाळी सापळा रचला. त्यात एकाने तीन हजार आणि दुस-याने पाच हजाराची लाच घेतल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.