शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देणेकऱ्यांच्या तगाद्यामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून तब्बल ३३ दिवस बेपत्ता झालेले व पुणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : देणेकऱ्यांच्या तगाद्यामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून तब्बल ३३ दिवस बेपत्ता झालेले व पुणे पोलिसांनी जयपूरहून शोधून आणलेले उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी येथील यीनयांग प्रोजेक्टमधील दोन फ्लॅट ग्राहकांना विकले असतानाही त्यावर परस्पर पतसंस्थेतून २ कोटी रुपयांचे कर्ज काढून फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी गौतम विश्वानंद पाषाणकर (रा. सेनापती बापट रोड), मंगेश अनंतराव गोळे (रा. हरिगंगा सोसायटी, येरवडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी महिपालसिंह विजयसिंह ठाकोर (वय ६१, रा. वडनेर, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पाषाणकर व मंगेश गोळे हे प्रॉक्सिमा क्रिएशनचे भागीदार आहेत. त्यांनी खराडी येथील यिनयांग प्रोजेक्ट येथील बिल्डिंग सी मधील फ्लॅट नंबर ९०२ हा ठाकोर यांनी १ कोटी ५६ लाख ६३ हजार ९८७ रुपयांना २०१५ मध्ये खरेदी केला होता. तसा करार करण्यात आला होता. मात्र, पाषाणकर व गोळे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे फ्लॅटचा ताबा दिला नाही.

तसेच महिंदर परसराम मनसे (रा. गीता सोसायटी, कॅम्प) यांनी फ्लॅट सी ८०२ हा ८१ लाख ९० हजार रुपयांना खरेदी केला होता. या दोघांनाही फ्लॅटचा ताबा देण्यापूर्वी त्यांच्यावर व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था, सांगली यांच्याकडून २ कोटी रुपये कर्ज काढून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली आहे.

खराडी येथील या प्रकल्पातील याच सी बिल्डिंगमधील पी १०१ व १०२ हे फ्लॅटबाबत नरेंद्र पाटील यांची फसवणूक केल्याप्रकरणी चार दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर शिवाजीनगर पोलिसांनी २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.