कात्रज-कोंढवा रस्त्यावर पुन्हा अपघात; दुचाकी आणि कंटेनरच्या धडकेत एक जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 01:29 PM2023-09-12T13:29:18+5:302023-09-12T13:31:58+5:30

या परिसरात पुन्हा एक अपघात झाला असून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला....

Another accident on Katraj-Kondhwa road; One person killed in a collision between a bike and a container | कात्रज-कोंढवा रस्त्यावर पुन्हा अपघात; दुचाकी आणि कंटेनरच्या धडकेत एक जण ठार

कात्रज-कोंढवा रस्त्यावर पुन्हा अपघात; दुचाकी आणि कंटेनरच्या धडकेत एक जण ठार

googlenewsNext

कोंढवा (पुणे) :कात्रजकोंढवा रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला असून दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात पुन्हा एक अपघात झाला असून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. अनिल नीलेश पतलावकर-राठोड असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे तर गणेश जाधव व सुनील राठोड अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, सोमवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास अनिल नीलेश पतलावकर (राठोड ), गणेश जाधव, सुनील राठोड, हे तिघे एकाच मोटारसायकलवर (एमएच ४६ एआर ४२२५) कात्रज-कोंढवा रस्त्यावरील टिळेकरनगर येथून खडीमशीन चौकाकडे जात होते. असताना खडीमशीन पोलिस चौकीच्या समोरून येणाऱ्या कंटेनर (एमएच १२ जेबी ६८८९) ला त्यांची धडक बसली. त्यामध्ये मोटारसायकल कंटेनरच्या चाकाखाली जाऊन अडकली व अनिल नीलेश पतलावकर राठोड याचा जागीच मृत्यू झाला तर गणेश जाधव व सुनील राठोड हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Another accident on Katraj-Kondhwa road; One person killed in a collision between a bike and a container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.