Pune Accident Nawale Bridge: मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पूल परिसर अपघातांचे केंद्र बनत चालला असून, आज (गुरुवारी) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास येथे पुन्हा एक थरारक अपघात घडला. वेगात असलेली एक कार अचानक पलटी झाली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास एक कार मुंबईच्या दिशेने जात होती. नवले पूल परिसरातील उतारावर ही कार आली असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार महामार्गावरच पलटी झाली. अपघातावेळी परिसरात वाहनांची वर्दळ होती, मात्र इतर कोणत्याही वाहनाला याची धडक न बसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला असल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली नाही. मात्र पोलिसांनी तातडीने क्रेन पाचारण करून कार बाजूला घेण्याचे काम सुरू केले, जेणेकरून पूर्णपणे वाहतूक सुरळीत होईल.
प्राथमिक अंदाजानुसार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवले पूल परिसरात वाहनांचा वेग कमी करण्यासाठी बसवलेले 'रम्बलर्स' (गतिरोधक पट्टे) या अपघाताला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. वेगात असलेल्या वाहनांना अचानक रम्बलर्सचा अंदाज न आल्याने किंवा त्यावर ब्रेक दाबल्याने गाडीचा ताबा सुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यापूर्वीही अनेक वाहनचालकांनी या रम्बलर्समुळे वाहने अनियंत्रित होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
Web Summary : Another accident occurred near Navale Bridge due to rumble strips, flipping a car. Fortunately, no one was injured, but the car was heavily damaged. Speed and the unexpected rumble strips are suspected causes, prompting previous complaints.
Web Summary : नवले पुल के पास रंबल स्ट्रिप्स के कारण एक और दुर्घटना हुई, जिसमें एक कार पलट गई। सौभाग्य से, कोई घायल नहीं हुआ, लेकिन कार बुरी तरह क्षतिग्रस्त हो गई। गति और अप्रत्याशित रंबल स्ट्रिप्स को कारण माना जा रहा है, पहले भी शिकायतें आई हैं।