शहरं
Join us  
Trending Stories
1
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
4
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
5
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
6
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
7
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
8
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
9
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
10
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
11
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
12
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
13
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
14
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
15
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
16
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
17
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
18
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
19
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
20
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

आमच्यासाठी'साहेबां'चे खडेबोलसुद्धा आशीर्वादच;बारामतीत कार्यकर्त्यांनी दिला पवार कुटुंबाच्या एकसंधतेचा संदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 22:09 IST

शरद पवारांच्या बोलण्याचे राजकीय भांडवल करणाऱ्या विरोधकांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांच्यासमवेत फोटो पोस्ट केलेला फोटो पुरेसा आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सोशल मिडियावर पोस्ट करत लगावला प्रतिटोला

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केलेली सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी प्रकरण असो किंवा जय श्री राम म्हणत अयोध्येतील राम मंदिराला दिलेल्या शुभेच्छा यानंतर राजकीय धुराळा उडाला होता. त्यावरून ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पार्थ अपरिपक्व असून नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नसल्याचे सांगत पार्थ यांना फटकारले होते.यावर राजकीय क्षेत्रात बुधवारचा दिवस अनेक तर्क वितर्कांसह गाजला गेला.भाजपच्या नेत्यांनी तर पार्थ लांबी रेस का घोडा असल्याचे म्हणत त्यांचे कौतुकही केले होते. मात्र या उद्भवलेल्या परिस्थितीवर बारामतीतराष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त झाले. या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समवेतचे पार्थ पवार यांचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करत पवार कुटुंब एकसंध असल्याचा संदेश दिला.

विरोधकांच्या पिढ्यांपिढ्या बरबाद होतील, पण त्यांना पवार घराण्याचे राजकारण कधीच समजणार नाही. पवार साहेबांच्या बोलण्याचे राजकीय भांडवल करणाऱ्या विरोधकांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडियावर पार्थ पवार यांच्यासमवेत फोटो पोस्ट केलेला फोटो पुरेसा आहे असल्याचे देखील नमूद करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विसरले नाहीत.

२०१९ लोकसभेच्या वेळी पार्थ पवार यांची भाजपने टर उडवली. भरभूर ट्रोल केले. तेच भाजपवाले आता पार्थपवारांचे गुणगान करुन त्यांच्यावर लावलेले दाग धुवून काढत आहेत. त्यांच्याकडून चकाचक कपडे धुवून घेण्यात पवारसाहेब पटाईत आहेत. त्यावेळी पार्थ पवारांना ट्रोल करणारे लोकं आता पार्थ पवार जिंदाबादचा नारा देत आहे असे म्हणत हाच आहे.'पवार पॅटर्न' असा टोला देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लगावला आहे. तसेच ‘पवारसाहेब’ जे बोलतात त्याच्या नेहमी उलटे असते. असे विरोधक म्हणतात,असे म्हणणारे विरोधक आज त्यांच्या ‘स्टेटमेंट’चा अर्थ तसाच उलटा आहे. हे सांगत आहेत. असा देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सोशल मिडियावर पोस्ट करीत प्रतिटोला लगावला आहे.-------------------

टॅग्स :BaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवारparth pawarपार्थ पवार