Ayush Komkar Case: आंदेकर टोळीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:28 IST2025-09-30T10:27:44+5:302025-09-30T10:28:12+5:30

गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती

Andekar gang sent to judicial custody | Ayush Komkar Case: आंदेकर टोळीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Ayush Komkar Case: आंदेकर टोळीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणात अटकेत असलेल्या आंदेकर टोळीतील सदस्यांची विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी सोमवारी (दि. २९) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत बंडू अण्णा आंदेकर (वय ७०), तुषार नीलंजय वाडेकर (२७), स्वराज नीलंजय वाडेकर (२३), अमन युसूफ पठाण (२५, सर्व रा. नाना पेठ), सुजल राहुल मेरगू (२०), यश सिद्धेश्वर पाटील (१९), अमित प्रकाश पाटोळे (१९), शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (२१), शिवराज उदयकांत आंदेकर (२९), कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (३६), मुनाफ रिजाय पठाण (२८, रा. नाना पेठ) यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे, तर यापूर्वीच लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०, सर्व रा. नानापेठ) आणि वृंदावनी नीलंजय वाडेकर (४०) यांना येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे.

गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील ॲड. विलास पठारे यांनी केली, तर आरोपी पोलिस कोठडीत असताना झालेल्या तपासाची माहिती तपास अधिकारी असलेले सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांनी दिली. आरोपींच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण, ॲड. मनोज माने, ॲड. प्रशांत पवार, ॲड. प्रतीक पवार आणि ॲड. अमित थोरात यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

Web Title : आयुष कोमकर मामला: आंदेकर गिरोह न्यायिक हिरासत में भेजा गया

Web Summary : आयुष कोमकर हत्याकांड में, सूर्यकांत आंदेकर सहित आंदेकर गिरोह के सदस्यों को एक विशेष न्यायाधीश ने न्यायिक हिरासत में भेज दिया है। अभियोजन पक्ष ने पुलिस हिरासत बढ़ाने की मांग की, जिसे दोनों पक्षों की दलीलें सुनने के बाद खारिज कर दिया गया। गिरोह के कुछ सदस्यों को पहले ही यरवदा जेल भेज दिया गया था।

Web Title : Ayush Komkar Case: Andekar Gang Remanded to Judicial Custody

Web Summary : In the Ayush Komkar murder case, members of the Andekar gang, including Suryakant Andekar, have been remanded to judicial custody by a special judge. The prosecution sought extended police custody, which was denied after hearing arguments from both sides. Some gang members were previously sent to Yerwada jail.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.