आंदेकर टोळीने संघटितरित्या उकळले २० कोटींचे खंडणी रॅकेट; बंडू आंदेकर, सोनालीसह ११ जणांवर गुन्हा, चौघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 19:18 IST2025-09-23T19:17:52+5:302025-09-23T19:18:04+5:30

पैसे न दिल्यास व्यापाऱ्यांना उचलून आणणे, मारहाण करणे आणि इतरांना धाक दाखवणे असे प्रकार घडवून आणले जात होते

Andekar gang organized a 20 crore extortion racket; 11 people including Bandu Andekar, Sonali booked, four arrested | आंदेकर टोळीने संघटितरित्या उकळले २० कोटींचे खंडणी रॅकेट; बंडू आंदेकर, सोनालीसह ११ जणांवर गुन्हा, चौघे अटकेत

आंदेकर टोळीने संघटितरित्या उकळले २० कोटींचे खंडणी रॅकेट; बंडू आंदेकर, सोनालीसह ११ जणांवर गुन्हा, चौघे अटकेत

पुणे: शहरात गाजलेल्या आंदेकर टोळीविरोधात पुणेपोलिसांनी आणखी मोठा फास आवळला आहे. गेल्या १२ वर्षांत तब्बल २० कोटी रुपयांची खंडणी संघटित पद्धतीने मासे विक्रेते आणि मध्यवर्ती भागातील व्यावसायिकांकडून उकळल्याप्रकरणी आंदेकर गँगचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर हिच्यासह ११ जणांविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यासोबतच, खंडणी वसुली करणारे टोळीतील शेखर दत्तात्रय अंकुश, मनेश उर्फ मनोज चंद्रकांत वर्धेकर, सागर बालकृष्ण थोपटे आणि रोहित सुधाकर बहादुरकर या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

संघटितरित्या चाललेली वसुली

एका अज्ञात मासे विक्रेत्या व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीतून धक्कादायक प्रकार उघडकीस आला. टोळीने मागील दशकभराहून अधिक काळ मासे विक्रेते तसेच स्थानिक व्यावसायिकांकडून दरमहा लाखो रुपयांची प्रोटेक्शन मनी उकळली. पैसे न दिल्यास व्यापाऱ्यांना उचलून आणणे, मारहाण करणे आणि इतरांना धाक दाखवणे असे प्रकार घडवून आणले जात होते. इतकेच नाही तर काहींना कर्ज काढून खंडणी द्यावी लागली, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.

पोलिसांची सलग कारवाई

- आयुष कोमकर खून प्रकरणानंतर आंदेकर टोळीवर पोलिसांनी चौफेर कारवाई सुरू केली आहे.

- खूनप्रकरणी मोक्का कारवाई

- तब्बल २७ बँक खाती गोठवली

- आंदेकरच्या घरावर छापा टाकून कोट्यवधींची मालमत्ता जप्त

- नाना पेठेतील अनधिकृत होर्डिंग्ज, स्टॉल्स व स्मृतीस्थळावरून शिल्प हटवले

 या कारवायांनंतर खळबळ उडाली असतानाच, आता टोळीच्या २० कोटींच्या खंडणी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आंदेकर टोळीविरोधातील या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, आणखी तक्रारी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे."

Web Title: Andekar gang organized a 20 crore extortion racket; 11 people including Bandu Andekar, Sonali booked, four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.