शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

.... आणि पुण्याच्या महापौरांनी मागितली नागरिकांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 9:34 PM

ही माफी स्वत:च्या चुकीसाठी नव्हे तर पालिका प्रशासनातील एका लाचखोर अधिकाऱ्याच्या कामटाळू वृत्तीमुळे मागितली..

ठळक मुद्देफेसबुक लाईव्हद्वारे संवाद : नागरिकांच्या समस्या समजावून घेण्याचा पहिलाच प्रयोग

पुणे : महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एका नागरिकांची चक्क माफी मागितली. परंतू, ही माफी स्वत:च्या चुकीसाठी नव्हे तर पालिका प्रशासनातील एका लाचखोर अधिकाऱ्याच्या कामटाळू वृत्तीमुळे मागावी लागली. महापौरांनी नागरिकाला होत असलेल्या त्रासाबद्दल माफी मागतानाच त्यांना कामाची ग्वाही देत दिलासाही दिला. महापौरांच्या या कृतीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. महापौर मोहोळ यांनी शनिवारपासून सुरु केलेल्या 'एफबी पे चर्चा ' मध्ये नागरिकांशी फेसबुक लाईव्हद्वारे ऑनलाईन संवाद साधला. या लाईव्हमध्ये नागरिकांनी सर्वाधिक प्रश्न शहरातील वाहतुकीसंदर्भात विचारले. आपापल्या भागातील वाहतुकीची कोंडी, उड्डाणपुलांची आवश्यकता आणि वाहतुक पोलिसांची संख्या वाढविण्यासारख्या समस्या विषद केल्या. त्यावर महापौरांनी शहरातील नियोजित वाहतूक प्रकल्पांची माहिती देऊन नागरिकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. सोशल मिडीयाचा वापर करुन नागरी समस्या सोडविण्याकरिता असा अभिनव उपक्रम राबविणारे मोहोळ हे पहिलेच महापौर ठरले आहेत. अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. कोथरूड, आझादवाडी येथील सरकारी सुतार दवाखाना येथील चौकात सतत वाहतूक कोंडी असते. त्यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात असे एका नागरिकाने सुचविले. नळस्टॉप चौक येथे दुहेरी उड्डाणपुलाचे काम आपण हाती घेतले तसेच इतर ठिकाणी उड्डाणपूल उभारून पुण्याची वाहतूक गतिमान करण्यात पुढाकार घ्यावा.तर शिवणे नांदेड मुठा नदीवर पूल व्हावा, शिवणे नवभारत चौकात ग्रेड सेपरेटर करावा, येथील अंतर्गत सोयीसुविधा कराव्यात अशी मागणी केली. पालिकेच्या शाळेतील मैदाने क्रीडा संघांना मोफत उपलब्ध करु न द्याव्यात. पीएमपीएमएलच्या निवृत्त झालेल्या कर्मचाºयांची बंद असलेली पेन्शन न्यायालयाने सांगूनही सुरु करण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. ज्या भागात मोठया प्रमाणात लोकसंख्या वाढते आहे, अशा चांदणी चौक ते पिरंगुट पर्यंतच्या परिसराचा विचार करता मेट्रो मार्ग पिरंगुटपर्यंत वाढवावा. गुजराथ कॉलनी मधील व्यापारी आणि नागरिक रस्त्यावर बसलेल्या भाजीवाल्यांना वैतागले आहेत. दहावी आणि बारावी चे पेपर जवळ येत आहेत, मुले वेळेत पोहचले पाहिजेत याकरिता वाहतूक पोलीस वाढवावेत अशा मागण्या केल्या. यासोबतच रस्त्यांवरील दिवे, झाडांच्या तुटलेल्या फांद्या, मुलांना खेळायला मैदान नाही, वाडा मालकांना स्वत: पुनर्विकास करण्यासाठी अर्थसहाय करावे असेही अनेकांनी नमूद केले.याच चर्चेदरम्यान, विजय शर्मा नावाच्या नागरिकाने त्यांना सांगितले की, कर पावतीवरील नाव बदलण्याकरिता एक वर्षभरापासून चकरा मारत आहे. परंतू, हे काम करुन देण्याकरिता लाच मागितली जात आहे. लाच न दिल्याने काम रखडले आहे. यावर मोहोळ यांनी शर्मा यांची माफी मागत त्यांना सोमवारी कार्यालयात येण्यास सांगितले. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासोबतच काम करुन देण्याची ग्वाही दिली. या ऑनलाईन चर्चेदरम्यान मोहोळ यांनी फेसबुक संवादामधून समस्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगतानाच तक्रारदारांनी त्यांचे मोबाईल क्रमांक नमूद करण्याचे आवाहन केले. तसेच स्वच्छ भारत अभियानाची सविस्तर माहिती दिली. पीएमपीच्या बसेसच्या संख्येत वाढ केली जाणार असल्याचे मोहोळ यावेळी म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेFacebookफेसबुकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरBJPभाजपा