शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

आंबेडकर- ओवेसी युतीवर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला सापडला ‘गणराज्य संघ’ चा उतारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 1:30 PM

वंचित बहुजन विकास आघाडीच्या सभांना होत असलेली गर्दी व त्या सभांमधून प्रकाश आंबेडकर, खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून काँग्रेस व शरद पवार यांच्यावर होत असलेली टीका यावर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला गणराज्य संघटनेचा उपाय सापडला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस राष्ट्रवादीचे पाठबळ : अडीचशे संघटनांचे एकत्रिकरणएकूण अडीचशे संघटना एकाच झेंड्याखाली एकत्र आल्याचा गणराज्य संघाच्या सुषमा अंधारे यांचा दावा वंचित बहुजन विकास आघाडीमुळे मतांचे विभाजन होईल या भीतीने आघाडीकडूनच गणराज्य संघाची निर्मिती

पुणे: वंचित बहुजन विकास आघाडीच्या सभांना होत असलेली गर्दी व त्या सभांमधून प्रकाश आंबेडकर, खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून काँग्रेस व शरद पवार यांच्यावर होत असलेली टीका यावर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला गणराज्य संघटनेचा उपाय सापडला आहे. गणराज्य संघ या संघटनेने पुढाकार घेत राज्यातील वेगवेगळ्या पुरोगामी संघटनांना एकत्र आणून आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. एकूण अडीचशे संघटना एकाच झेंड्याखाली  एकत्र आल्याचा दावा यासाठी पुढाकार घेणाऱ्या गणराज्य संघाच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. आंबेडकर व खासदार ओवेसी यांनी एकत्र येत वंचित विकास बहुजन विकास आघाडी स्थापन केली आहे. अलुतेदार, बलुतेदार यांना त्यांनी एकत्र आणले आहे. त्यांच्या सभाही होत आहेत. या सभांमधून आंबेडकर व ओवेसी सत्ताधारी भाजपाला कमी व काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यावरच आगपाखड करीत आहेत. काँग्रेसने पुढे केलेला हात झिडकारत आंबेडकर यांनी तुम्ही प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतचे धोरण जाहीर करा अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीला तर रोज टिकेचे कोरडे ओढत आहेत. त्यामुळे धाबे दणाणलेल्या आघाडीने गणराज्य संघटनेचा उपाय शोधला असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात रंगू लागली आहे. श्रीमती अंधारे यांच्यासह बहुजन रिपब्लिक्न सोशालिस्ट पाटीर्चे सुरेश माने, मानव हक्क अभियानचे डॉ. मिलिंद आवाड, गनिमी कावा संघटनेचे संजय जगताप, महाराष्ट्र युवा शक्तीचे सुनिल सौदागर, दंगल मुक्त महाराष्ट्रचे शेख सुभान अली अशा अनेक संघटनांनी मिळून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे. गणराज्य च्या सुषमा अंधारे यांनी एकूण २५० संघटना असल्याचा दावा केला. यातील बहुतेक संघटना अराजकीय आहेत. गेली अनेक वर्षे जातीयवादाच्या विरोधात काम करत आहेत. सत्ताधारी भाजपाचा गेल्या साडेचार वषार्तील कारभार धर्मांध शक्तींना बळ देणारा, त्यांच्यासाठीच काम करणारा व सर्वसामान्य वंचित, उपेक्षितांकडे दुर्लक्ष करणारा होता. त्यांचा पराभव व्हावा, त्यांना पुन्हा सत्ता मिळू नये या एकमेव हेतूने आघाडीला पाठिंबा देत असल्याचे अंधारे यांनी जाहीर केले आहे.आंबेडकरी चळवळीत उभी फूट असे याचे आघाडीकडून खासगीत वर्णन केले जात जात आहे. वंचित बहुजन विकास आघाडीमुळे मतांचे विभाजन होईल या भीतीने आघाडीकडूनच ही निर्मिती केली असल्याचे बोलले जात आहे. अंधारे यांना याबाबत विचारले असता त्यांनी याला नकार दिला. आम्ही कोणताही राजकीय इच्छा न बाळगता हा पाठिंबा देत आहोत. वंचित बहुजन विकास आघाडीबरोबर काँग्रेसची चर्चा सुरू आहे असे आम्हाला समजले आहे, त्यावर आम्हाला काहीही बोलायचे नाही, त्यांनी आघाडीत यावे, आमचा त्यांना विरोध नाही, पण निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे असे अंधारे तसेच त्यांच्यासमवेत उपस्थित असलेल्या अन्य संघटनांच्या पदाधिकाºयांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर