शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सर्व पुतळे ‘जैसे थे’च राहणार

By admin | Updated: March 21, 2015 00:11 IST

थोर पुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना होत असल्याने शहरातील सर्व पुतळे सारसबागेतील तळ्याभोवती बसवून स्टॅच्यू पार्क बनविण्याचा प्रस्ताव शुक्रवारी मुख्य सभेत अनुमोदन न मिळाल्याने वगळण्यात आला.

पुणे : थोर पुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना होत असल्याने शहरातील सर्व पुतळे सारसबागेतील तळ्याभोवती बसवून स्टॅच्यू पार्क बनविण्याचा प्रस्ताव शुक्रवारी मुख्य सभेत अनुमोदन न मिळाल्याने वगळण्यात आला. विशेष म्हणजे हाच प्रस्ताव, आॅगस्ट १९९७ मध्ये मुख्य सभेत ठेवण्यात आला होता. त्या वेळीही अनुमोदन न मिळाल्याने तो वगळण्यात आला होता. थोर पुरुषांच्या विटंबनाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यामुळे होणाऱ्या दंगली तसेच तणावाच्या वातावरणामुळे राट्रीय संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी तसेच महापुरुषांचा सन्मान राखण्यासाठी हे सर्व पुतळे सन्मानपूर्वक एका उद्यानात बसवून त्या ठिकाणी स्टॅच्यू पार्क बनवावे तसेच त्यासाठी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था करावी. तसेच या प्रकारची उद्याने राज्य शासनाने प्रत्येक शहरात करावीत, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश द्यावेत आणि त्याची स्वतंत्र नियमावली राज्य शासनाने करून त्यांच्या अंमलबजावणीचे आदेश द्यावेत, असा शासनास विनंती करणारा प्रस्ताव तयार करण्याची सूचना उपमहापौर आबा बागूल, नगरसेवक रवींद्र धंगेकर, सुधीर जानजोत, किशोर शिंदे, बाळा शेडगे, प्रकाश ढोरे, बाबू वागसकर, नगरसेविका नीलम कुलकर्णी यांनी दिली होती. तसेच यासाठी १९९७मध्ये सर्व पुतळे सारसबागेतील तळ्याच्या परिसरात बसवावेत याबाबतचा ठेवण्यात आलेल्या प्रस्तावाचा फेरविचार करावा, अशी सूचना दिली होती. त्यानुसार, सर्व पुतळे एका ठिकाणी हलविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.१९९७ मध्ये वगळला होता प्रस्ताव सर्व पुतळे एकाच ठिकाणी सारसबागेतील तळ्याच्या परिसरात हलविण्याचा प्रस्ताव १९९७ मध्ये तत्कालीन उपमहापौर हिरामण शिंदे आणि तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष आबा बागूल यांनी ठेवला होता. त्या ठिकाणी पुतळा बसवून त्याखाली महापुरुषांची माहिती द्यावी, त्यामुळे पर्यटकांना सर्वच माहिती एकाच ठिकाणी मिळून त्याची देखभाल दुरुस्तीही नियमित होईल, असा हा प्रस्ताव होता. मात्र, त्या वेळीही अनुमोदन न मिळाल्याने तो वगळण्यात आला होता. तसेच आजही १८ वर्षांनंतरही अनुमोदन न मिळाल्याने तो वगळला.