शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पुणे शहरातील ‘कंटेनमेंट झोन’वगळता इतर भागातील सर्व दुकाने १२ तास खुली राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 13:54 IST

प्रत्येक दुकानामध्ये फिजिकल डिस्टसिंग पाळणे व राखणे याची जबाबदारी ही संबंधित दुकानदारांची राहणार

ठळक मुद्देपाच दुकानांचा संभ्रम दूर : दिवसाआड दिली दुकाने खुली करण्यास मान्यताकिराणा, दूध, भाजीपाला, फळे, सर्व प्रकारचे दवाखाने व औषध दुकाने यांचा समावेश आदुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उघउी राहणार

पुणे : पुणे शहरातील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील जीवनावश्यक वस्तूंसह इतर सर्व दुकाने बुधवारपासून सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत खुली ठेवण्यास मान्यता दिली आहे. ही मान्यता देताना कोणती दुकाने कधी सुरू ठेवायची याचे वेळापत्रकही महापालिकेने जाहिर केले आहे. ही मान्यता देताना लक्ष्मी रस्त्यासह पुण्यातील मुख्य बाजारपेठ बंदच राहणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे नवे आदेश मंगळवारी सायंकाळी काढले आहेत. यामुळे गेली कित्येक दिवस कोणती दुकाने खुली राहणार त्यांची वेळ काय याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. या आदेशानुसार, एक रस्ता किंवा गल्लीमध्ये जास्तीत जास्त पाच दुकानांनाच प्रति १ किलोमिटर प्रमाणे मुभा देण्यात आली आहे.मात्र, याठिकाणीही दुकानांची संख्या जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, वाराप्रमाणे दुकाने खुली करण्यास परवानगी दिली गेली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना मात्र कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. ती दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उघउी राहणार असून, यामध्ये किराणा, दूध, भाजीपाला, फळे, सर्व प्रकारचे दवाखाने व औषध दुकाने यांचा समावेश आहे. दरम्यान पुणे महापालिकेने सर्व दुकाने सुरू करण्यास जरी परवानगी दिली असली तरी, पुण्याची बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, आप्पा बळवंत चौक, कुमठेकर रस्ता, महात्मा गांधी रस्ता( एम जी रोड), कोंढवा रोड, ज्योती हॉटेल ते एनआयबीएम रस्ता येथील दुकाने मात्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली नाही. परंतू येथील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने खुली ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

* दुकानांना परवानगी देतानाच जीवनावश्यक वस्तूंचे व औषधांचे आणि तयार अन्न पदार्थांचे घरपोच वाटप करण्यास सकाळी १० ते रात्री १० पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

वस्तू विक्रीसाठी निश्चित केलेले दिवस व व्यवसायाचा प्रकार पुढील प्रमाणे:* सोमवार- इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय अनुषंगिक साहित्य साधने सामुग्री व मोबाईल विक्री व दुरुस्ती इलेक्ट्रिक वस्तू विक्री व दुरुस्ती, भांड्याची विक्री दुकाने. * मंगळवार-  वाहनांची दुरुस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य साधन सामुग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने* बुधवार-इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय अनुषंगिक साहित्य साधने सामुग्री व मोबाईल विक्री व दुरुस्ती इलेक्ट्रिक वस्तू विक्री व दुरुस्ती, भांड्याची विक्री दुकाने. * गुरुवार -वाहनांची दुरुस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य साधन सामुग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने* शुक्रवार-इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय अनुषंगिक साहित्य साधने सामुग्री व मोबाईल विक्री व दुरुस्ती इलेक्ट्रिक वस्तू विक्री व दुरुस्ती, भांड्याची विक्री दुकाने. *शनिवार -वाहनांची दुरुस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य साधन सामुग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने.* रविवार-वाहनांची दुरुस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य साधन सामुग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने.

नवे आदेश जारी करताना, प्रत्येक दुकानामध्ये फिजिकल डिस्टसिंग पाळणे व राखणे याची जबाबदारी ही संबंधित दुकानदारांची राहणार आहे. तसेच प्रत्येक दुकानदारांनी आपल्या कामदारांना फोटोसह ओळखपत्र देण्याबाबतही सूचना करण्यात आली आहे. 

टॅग्स :Puneपुणेvegetableभाज्याfruitsफळेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस