शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

डोक्यात लाकडी फळी मारून मद्यपी पतीने पत्नीचा केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 1:25 PM

माळीमळा परिसरात बुधवारी (दि. १) पहाटे सुवर्णा कांबळे (वय ३०) या महिलेचा मद्यपी पतीने डोक्यात लाकडी फळी मारुन खून केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देकिसन मारहाण करत असल्याने गेली ७ ते ८ वर्ष ती आपल्या मुलांसह माळीमळा येथे राहत होती.४ ते ५ वर्षापूर्वी सुवर्णा हिस लोखंडी गजाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले होते.

लोणी काळभोर : येथील माळीमळा परिसरात बुधवारी (दि. १) पहाटे मद्यपी पतीने  डोक्यात लाकडी फळी मारुन पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. तर घटनास्थळापासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या उंबराच्या झाडाला पतीने साडीच्या साह्याने फाशी घेतली आहे. सुवर्णा किसन कांबळे (वय ३०, सध्या रा. माळीमळा, संजय गायकवाड चाळ, खोली क्रमांक ११, लोणी काळभोर, ता. हवेली) असे मृत महिलेचे नाव असून पती किसन रामा कांबळे (वय ३५, दोघे मूळ रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर) याने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मृत सुवर्णा यांची आई लक्ष्मी शहाजी साळवे (वय ५५, रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली ) यांनी फिर्याद दिली आहे. हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णा हिस दोन मुली व एक मुलगा असून ट्रक ड्रायव्हर असलेला तिचा पती किसन हा दारू पिवून शिवीगाळ तसेच मारहाण करत असल्याने गेली ७ ते ८ वर्ष ती आपल्या तीन मुलांसह माळीमळा येथे खोली घेऊन राहत होती. ती मगरपट्टा सिटी हडपसर येथे धुण्याभांड्याची कामे करून उदरनिर्वाह करत होती. अधून-मधून तिचा पती किसन हा येथे येवून तिला मारहाण  करत असे. ४ ते ५ वर्षापूर्वी सुवर्णा हिस लोखंडी गजाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले होते. त्यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिने तक्रार दिली होती.दोन दिवसांपूर्वी किसन हा माळीमळा येथे आला. त्याने मद्यप्राशन केल्याने सुवर्णा हिने तुम्ही येथे राहू नका निघून जा, असे सांगितले. त्यावेळी दोघांत मोठे भांडण झाले होते. तेव्हापासून तो पत्नीवर चिडून होता. मंगळवारी (३१ आॅक्टो.) रात्री पत्नी त्याला टेरेसवर झोपावयास जा, असे म्हटल्याने त्या कारणावरून त्याने वाद घातला होता. त्यानंतर १०च्या सुमारास ते सर्वजण झोपी गेले.सुवर्णा हिच्या राजश्री व धनश्री या दोन्ही मुली व्यायामाला जात असल्याने पहाटे ५-३०च्या सुमारास त्यांच्या मैत्रीणी त्यांना उठविण्यास आल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता सुवर्णा या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांनी राजश्री व धनश्री यांना उठवले. आपली आई निपचित पडली असून वडील घरात नाहीत हे पाहून त्यांनी आपल्या आजीला फोन करून बोलावले.लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. नंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ससून रूग्णालयात पाठवण्यात आला. रात्री तिथे मुक्कामांस असलेला तिचा पती दिसत नसल्याने खून त्यानेच केला असल्याची खात्री पोलिसांना पटली. त्यांनी त्यादृष्टीने तपास करण्यास सुरूवात केली होती. घटनास्थळापासून पूर्वेस १०० मीटर अंतरावर सुनिल बाबुरांव गायकवाड यांची शेती आहे. ते आज सकाळी १०च्या सुमारास शेतीस पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना बांधावरील उंबराच्या झाडाला एकाने साडीच्या साह्याने फाशी घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ही बाब पोलिसांना कळवली. पोलीस तेथे पोहचल्यानंतर चौकशी केली असता किसन कांबळे याचा मृतदेह असल्याचे समजले.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा