पिसाळवाडीतील दरीत आढळला तरुणाचा फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह; घातपाताचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:07 PM2017-10-13T12:07:08+5:302017-10-13T12:11:09+5:30

काळदरी गावच्या वनविभागाच्या हद्दीतील डोंगराच्या उतारावरील रानामध्ये एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह एका झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसून आला आहे.

Dead found in Pisalwadi valley; Suspicion of assault | पिसाळवाडीतील दरीत आढळला तरुणाचा फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह; घातपाताचा संशय

पिसाळवाडीतील दरीत आढळला तरुणाचा फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह; घातपाताचा संशय

Next
ठळक मुद्देसंबंधित युवकांच्या कुटुंबीयांनी या घटनेबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गोसावी आणि सहायक फौजदार एस. आर. गायकवाड करीत आहेत.

सासवड : पुरंदर तालुक्यातील काळदरी गावच्या वनविभागाच्या हद्दीतील डोंगराच्या उतारावरील रानामध्ये एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह एका झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसून आला आहे. दरम्यान संबंधित युवकांच्या कुटुंबीयांनी या घटनेबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. 
अंकुश शिवाजी बांदल (वय २२, रा. सुपे खुर्द, ता. पुरंदर) असे या घटनेतील मृत युवकाचे नाव आहे. जीवन शिवाजी शेडगे (वय २०, रा. काळदरी, पिसाळवाडी) या गुरे राखणार्‍या तरुणाने संबंधित घटनेची पोलिसांना खबर दिली. 
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १२) काळदरी परिसरातील पिसाळवाडी येथील गुरे राखणारे गुराखी नेहमीप्रमणे डोंगराच्या परिसरात जनावरे चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यातील एका शेतकर्‍याचा बैल चरताना दाट झाडीमध्ये गेला. व तो परत आणण्यासाठी गेला असताना त्या गुराख्याला लांबूनच उग्र असा वास आला. तसेच बैला जवळ गेला असता त्याला एका झाडाला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यावेळी त्यांनी इतर शेतकर्‍यांना बोलावून याबाबत माहिती दिली. त्यानंतर सासवड पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिसांनी संबंधित मृतदेह झाडावरून खाली घेतला. तसेच मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याच ठिकाणी पंचनामा करून मृतदेहाची तपासणी केली असता पॅन्टच्या खिशामध्ये आधारकार्ड मिळून आले. त्यावरून त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना बोलाविण्यात आले. त्याच ठिकाणी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गोसावी आणि सहायक फौजदार एस. आर. गायकवाड करीत आहेत. 

Web Title: Dead found in Pisalwadi valley; Suspicion of assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.