शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीकरांचा स्वच्छतेचा संदेश

By admin | Updated: July 8, 2015 01:26 IST

नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग, हजारो वारकरी, नागरिक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आज आळंदीत स्वच्छतेची दिंडी काढून अवघ्या महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला.

आळंदी : नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग, हजारो वारकरी, नागरिक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आज आळंदीत स्वच्छतेची दिंडी काढून अवघ्या महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला. कीर्तनकाराचा वेष परिधान केलेले मुख्याधिकारी औंधकर, खादीचे धोतर, सदरा, त्यावर काळे जॅकेट आणि डोक्यावर स्वच्छतेचा संदेश देणारी पांढरी टोपी घालून स्वच्छतादूताच्या वेषातील नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्यासह टाळमृदंगाचा गजर करत डोक्यावर स्वच्छता संदेश देणाऱ्या टोप्या व हातात फलक घेऊन निघालेल्या चिमुकल्यांनी आळंदीलाच नव्हे, तर महाराष्ट्रालाच जणू स्वच्छतेचा संदेश दिला. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानांतर्गत आळंदी येथे स्वच्छतेचा संकल्प स्वच्छता दिंडीतून करण्यात आला.सकाळी १० वाजता नगर परिषदेपासून शुभारंभ करण्यात आलेल्या या दिंडीत मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी डोक्यावर फेटा व अंगातील सदऱ्यावरून साक्षात ख्यातनाम कीर्तनकाराचा वेष परिधान केलेला, तर नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांनी डोक्यावर स्वच्छतेचा संदेश देणारी टोपी, पांढरा खादीचा सदरा, धोतर व त्यावर काळे जॅकेट, तर शालेय विद्यार्थ्यांनी आपापल्या शालेय गणवेशात डोक्यावर स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पांढऱ्या शुभ्र टोप्या, हातात स्वच्छतेचा जागर करणारे घोषवाक्ये लिहिलेले फलक, शिक्षिका, शिक्षक, प्राध्यापक, विविध दिंडीतील दिंडीकरी, आळंदीत दाखल झालेले वारकरी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, स्थानिक नागरिकांनी मोठा सहभाग होऊन हा उपक्रम यशस्वी केला.नगर परिषदेपासून सुरू झालेली ही स्वच्छता दिंडी नवीन एस.टी. स्टॅण्ड, चाकण चौक, प्रदक्षिणा मार्ग, नगर परिषद चौक ते महाद्वार चौक अशा मार्गाने परिक्रमा करून इंद्रायणीच्या घाटावर पोहोचला.