शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांचे कट्टर समर्थक शैलेश मोहितेंचा उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 09:35 IST

आमदार दिलीप मोहिते - पाटील आणि आमचे घरचे संबंध चांगले आहेत, पण राजकारणात आमची वेगळी भूमिका

शेलपिंपळगाव : पुण्यात अजित पवार गटाला ठाकरे गटाने आणखी एक धक्का दिला आहे. एकेकाळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेले डॉ. शैलेश मोहिते - पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तळेगाव दाभाडे येथे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत पक्ष प्रवेश केला आहे. विशेषतः शैलेश मोहितेंच्या प्रवेशाने खेड तालुक्यात उद्धव ठाकरे गटाला ताकद प्राप्त होणार आहे.

 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे नेते तथा खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते - पाटील यांचे एकेकाळी शैलेश मोहिते हे अत्यंत विश्वासू व जवळचे शिलेदार होते. आमदारांचे पुतणे म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. एकीकडे मावळमधील अजित पवारांचे समर्थक संजोग वाघेरे यांनीही काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला होता. तर आता मावळपाठोपाठ खेडमधील शैलेश मोहितेंसारखा कार्यकर्ता ठाकरेंच्या गळाला लागल्याने अजित पवार गटासाठी हा धक्का मानला जात आहे.               ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर शैलेश मोहिते म्हणाले, "मी राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन वर्षांपूर्वीच राजीनामा दिला आहे. आमदार दिलीप मोहिते - पाटील आमचे घरचे संबंध चांगले आहे. पण राजकारणात आमची वेगळी भूमिका आहे. आगामी काळात पक्ष संघटना वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असून पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची माझी तयारी आहे. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे