शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
3
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
4
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
5
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
6
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
7
Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
8
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
9
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
10
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
11
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
12
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
13
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
14
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
15
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
16
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
17
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
18
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
20
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?

पुण्यातील कोयता गॅंगचा सुफडा साफ करणार - अजित पवार

By राजू हिंगे | Updated: March 10, 2024 15:58 IST

मुलांची वय लहान असल्यामुळे आम्हाला कायदयाची अडचण येते, त्यामुळे या मुलांच्या आईवडींला बोलविणार

पुणे : पुण्यातील कोयता गॅगचा सुफडा साफ करणार आहे. १२ ते १५ वर्षाची मुले हातात कोयता, तलवारी हातात घेउन  फिरत बसतात. त्यांना जरब बसविणार आहे. त्यांचे  वय लहान असल्यामुळे आम्हाला कायदयाची अडचण येते. त्यामुळे या मुलांच्या आईवडींला बोलविणार आहे. त्यामुळे मुलांना नीट वागायला शिकवा. आम्ही कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

वडगावशेरी मतदारसंघातील १७५ कोटीच्या कामाचे भुमिपुजन आणि उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.  त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार सुनिल टिंगरे  पांडुरंग खेसे, अशोक खांदवे आदी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी आज ९ हजार ८०० कोटी रूपयांच्या वेगवेगळी टमिनल आणि विमानतळाचे उदघाटन केले आहे. मेट्रोने रोज जाणा०या नागरिकांची संख्या १५ हजाराने वाढली आहे. मेट्रोचे काम पुर्ण  झाल्यावर रिक्षा आण बसेसवरील ताण कमी होणार आहे. विमानतळाची लांबी वाढवत आहे. राज्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम करत आहे. सगळे प्रकल्प गुजरातला चालले आहे अशा थापा विरोधक  मारत आहे. काही गुजरातला चालले नाही. महाराष्ट्रातील गोष्टी महाराष्ट्रातच राहणार आहे.  पुणे आणि पिपंरी चिचंवडला रिंगरोडसाठी जमीन ताब्यात घेण्याचे काम अंतिम टप्पात आहे. या रस्त्यामुळे बाहेरच्या बाहेर लोकांना जाता येणार आहे. आता वाहतुक काेंडीचा त्रास होत आहे. आता कृषिविघापीठातुन रस्ता करत आहे. तो ३० मार्च पर्यत पुर्ण होणार आहे. पुणे महापालिकेचे ११ हजार ६०० कोटीचे तर राज्याचे बजेट ६ लाख कोटीचे बजेट आहे असेही पवार यांनी सांगितले. 

आता पदर नाही डायरेक्ट टायरमध्ये  

 शहराची कायदा सुवस्था चांगली राहिली पाहिजे. कसली रे कोयता गॅग. कोयता गॅगचा सुफडा साफ करणार आहे .१२ ते १५ वर्षाची मुले हातात कोयता, तलवारी हातात घेउन  फिरत बसतात.  त्यामुळे या मुलांच्या आईवडींला बोलविणार आहे.  तुमचा मुलगा काय दिवा लावतो ते पहा. त्यामुळे आई वडीलांनी मुलां, कार्टला नीटपणे वागायला शिकविले पाहिजे. मला काय माहिती माझे पोरग असे काय करले ते ऐकुन घेणार नाही. आईवडीलांना मुला मुलीचे मित्र मैत्रिणी कोण आहेत तो काय करतो हे माहिती असायला पाहिजे.  किती मोठया बापाचे असेल तर मुलाहिजा ठेवणार नाही. दादा एकदा चुक झाली आता पदरात घ्या. पदर आमचा फटाला आहे. आता पदर नाही. धोतर नाही. आता डायरेक्ट टायरमध्येच जाणार आहे. विश्रांतवाडीत परवाच घडले. त्यांना हडुकन काढतो . पुणे विघेचे माहेरघर आहे. त्याकमीपणा वाटेल असे वागु नका असे अजित पवार यांनी सांगितले. नवीन पोलिस आयुक्त आल्यानंतर साडेचार हजार कोटीचे ड्रग्ज पकडले आहे. त्याचे धागेदोरे  लंडन, पजाब , दिल्ली मध्ये निघाले. झटपट श्रीमंत होण्यासाठी उघोग करत आहे. चांगले लोक अडचणीत आणि नवीन पिढी व्यसनाधीन होत आहे असेही त्यांनी सांगितले. 

झाडे तोडू नका 

पुण्यात विकास कामेे करण्यासाठी  घेतल्यावर झाडे तोडु नका असे सांगुन स्थगिती दिली जाते. त्यामध्ये १५ ते २० दिवस जातात. कोटाचे निणर्य ऐकावे लागतात असेही अजित पवार यांनी सांगितले.  

दिवसभरात  १हजार १७५ कोटीची भुमिपुजने , उदघाटने वारजे येथे ५०० कोटी , लोहगाव विमानतळ ५०० कोटी आणि वडगाव शेरी मतदारसंघातील १७५ कोटीची भुमिपुजने आणि उदघाटनाचे कामे करण्यात आली आहे. पायाभुत सुविधा, दर्जदार आणि सौदर्यपुर्ण आणि गुणवत्तापुर्ण कामे झाली पाहिजेत.  कामा मध्ये हलगर्जीपणा खपवुन घेणार नाही. कामामध्ये कुचराई करणा०या ठेकेदाराला काळया यादीत टाकेले जाणार आहे. यंदाच्या बजेटमध्ये शहरात सर्वात जास्त निधी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाला दिला आहे, असे  अजित पवार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliceपोलिसPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस