Ajit Pawar Passed Away : खऱ्या अर्थाने ते पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार होते; शहराचा लौकिक सर्वत्र दादामुळेच

By विश्वास मोरे | Updated: January 29, 2026 14:48 IST2026-01-29T14:48:07+5:302026-01-29T14:48:55+5:30

आजम पानसरे म्हणाले, १९८४ पासून माझी आणि दादांची ओळख आहे. त्यानंतर आजपर्यंत त्यांच्याशी आणि पवार कुटुंबाशी आमचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे

Ajit Pawar Passed Away He was truly the architect of Pimpri Chinchwad city; the city's reputation is due to him. | Ajit Pawar Passed Away : खऱ्या अर्थाने ते पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार होते; शहराचा लौकिक सर्वत्र दादामुळेच

Ajit Pawar Passed Away : खऱ्या अर्थाने ते पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार होते; शहराचा लौकिक सर्वत्र दादामुळेच

पिंपरी : अजित दादा पवार यांच्याविषयी काय बोलू? खूप धक्का बसला आहे. काहीच सुचत नाही. एवढेच सांगेल की पिंपरी चिंचवड शहराचा आधार गेला.  अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक लोकांना, संस्थांना मोठे केले. त्यामुळे शहराचा लौकिक सर्वत्र होत आहे, असे सांगत होते माजी महापौर आझम पानसरे. 

आजम पानसरे म्हणाले, १९८४ पासून माझी आणि दादांची ओळख आहे. त्यानंतर आजपर्यंत त्यांच्याशी आणि पवार कुटुंबाशी आमचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. १९९१ मध्ये खासदारकीच्या निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर त्यांनी सर्व तरुण कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं एकत्रीकरण करण्याचं काम केलं होतं. खऱ्या अर्थाने ते पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार होते, असे म्हटले तर वावगे ठरवू नये. 

त्यांचे गुण सांगायचे झाल्यास कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी ओळखून त्यांना मदत करणे, तातडीने निर्णय घेणे, स्पष्टपणे बोलणे हा त्यांचा गुण सर्वांना आवडायचा.  त्यांच्या नेतृत्वाखाली लौकिक वाढविला स्मार्ट सिटी, बेस्टसिटी म्हणूनही लौकिक वाढविला. महापौर होण्याच्या आणि माझ्या राजकीय, सामाजिक वाटचालीमध्ये दादांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या झाल्यानंतरही त्यांनी शहरांमध्ये अनेकदा येऊन आमच्याशी संवाद साधला होता कार्यकर्त्यांना बळ दिलं होतं.  

Web Title : अजित पवार का निधन: पिंपरी चिंचवड के शिल्पकार, स्नेहपूर्वक याद

Web Summary : पूर्व महापौर आज़म पानसरे ने अजित पवार के निधन पर शोक व्यक्त किया, पिंपरी चिंचवड के विकास में उनकी महत्वपूर्ण भूमिका पर जोर दिया। पवार के व्यक्तियों, संस्थानों के लिए समर्थन और निर्णायक नेतृत्व ने शहर की प्रतिष्ठा को स्मार्ट और सर्वश्रेष्ठ शहर के रूप में काफी बढ़ाया। पानसरे की राजनीतिक यात्रा में उनका योगदान अमूल्य था।

Web Title : Ajit Pawar's Passing: Architect of Pimpri Chinchwad, Remembered Fondly

Web Summary : Former Mayor Azam Pansare mourns Ajit Pawar's death, emphasizing his pivotal role in developing Pimpri Chinchwad. Pawar's support for individuals, institutions, and decisive leadership significantly elevated the city's reputation as a Smart and Best City. His contributions to Pansare's political journey were invaluable.