पुणे : पुणे जिल्हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे तब्बल १६ वर्षे पालकमंत्री राहिले. राज्यासह पुणे जिल्ह्याचा कानाकोपरा त्यांना माहिती होता. विविध विकासकामांच्या माध्यमातून अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला. आयटी हब असलेली हिंजवडी असो की चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवार पहाटे रस्त्यावर उतरत होते. प्रश्नांची जाण, निर्णय घेण्याच्या क्षमतेबरोबर विकासकामांच्या दर्जावर त्यांचे लक्ष होते. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी ‘नासा’ला पाठवले होते.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार राजकारणात आले. वर्ष १९९१ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले होते; पण शरद पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी १९९१ मध्ये निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते सलग बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाचे ८ आमदार निवडून आले होते. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवारच दादा राहिले आहेत. अजित पवार हे शेतकरी, कष्टकरी समाजासाठी प्रचंड प्रेम आणि जिव्हाळा असलेले नेतृत्व होते.
जिल्हा परिषद शाळेतील मुलांना ‘नासा’ला पाठवले
अजित पवार यांच्या पुढाकाराने पुणे जिल्हा परिषदेतील शालेय विद्यार्थ्यांना नासा संस्थेला भेट देण्यासाठी पाठवण्यात आले. ‘नासा’ एक जागतिक पातळीवरची महत्त्वाची संस्था आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरिबांच्या हुशार मुलांची बुद्धिमत्ता पाहून त्यांचे सिलेक्शन करून पाठवले होते.
१६ वर्षे पालकमंत्री राहण्याचा मान
उपमुख्यमंत्री अजित पवार हे २००४ ते २०१४ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात दहा वर्षे पालकमंत्री होते. २०१९ ते २०२२ महाविकास आघाडी सरकारमध्ये ते पुन्हा पालकमंत्री झाले होते. २०२३ ते २०२६- महायुती सरकारमध्ये अजित पवार पालकमंत्री झाले. १६ वर्षे ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पुण्याचे पालकमंत्री म्हणून सर्वाधिक काळ राहण्याचा मान त्यांना मिळाला.
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी मोलाचे योगदान
पुरंदर येथे छत्रपती संभाजीराजे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अजित पवार यांचे योगदान महत्त्वाचे आहे. या विमानतळासाठी जागेचे भूसंपादन करण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली. पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी अर्थमंत्री म्हणून निधी उपलब्ध करून दिला. पालखी मार्गासाठी त्यांचा सर्वाधिक पुढाकार होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘पुणे ग्रॅण्ड सायकल टूर’ स्पर्धेसाठी अजित पवार यांचा मोलाचा वाटा होता.
Web Summary : Ajit Pawar, as Pune's Guardian Minister for 16 years, significantly developed the district. He focused on infrastructure, education, and rural development, including sending students to NASA and backing the Purandar airport project.
Web Summary : अजित पवार ने 16 वर्षों तक पुणे के पालकमंत्री के रूप में जिले का विकास किया। उन्होंने बुनियादी ढांचे, शिक्षा और ग्रामीण विकास पर ध्यान केंद्रित किया, जिसमें छात्रों को नासा भेजना और पुरंदर हवाई अड्डे परियोजना का समर्थन करना शामिल है।