शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Passed Away: तीव्र दुःखातही माणुसकीचा उजळलेला दीप; बारामतीत सामाजिक बांधिलकीचे दर्शन, रात्री मोफत जेवणाची सोय

By नितीश गोवंडे | Updated: January 29, 2026 13:12 IST

Ajit Pawar Passed Away काही हॉटेल चालक मदतीसाठी पुढे सरसावले, त्यांनी कोणताही व्यावसायिक विचार न करता रात्री मोफत जेवणाची व्यवस्था केली

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमान तळाजवळ अपघातात मृत्यू झाल्याची बातमी राज्यभरात वाऱ्यासारखी पसरली. दादा गेले ही बाब बारामतीकरांना समजताच संपूर्ण बारामती शोकसागरात बुडाल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले. या बातमीमुळे महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते, समर्थक आणि चाहत्यांनी बारामतीकडे धाव घेतली. शहरात काहीकाळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अजित पवार आपल्यात नाहीत ही बाब मान्य करायलाच बारामतीकर तयार नव्हते. दादांप्रती आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून संपूर्ण बारामती बंद ठेवण्यात आले होते.

बंदमुळे बाहेरून आलेल्या नागरिकांचे खाण्यापिण्याचे तसेच राहण्याचे मोठे हाल होत असल्याचे चित्र बुधवारी दिवसभर दिसून आले. अनेकजण रात्री उशिरापर्यंत शहरात अडकून पडले होते. अशा परिस्थितीत बारामतीतील व्यावसायिकांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. काही हॉटेल चालक मदतीसाठी पुढे सरसावले. त्यांनी कोणताही व्यावसायिक विचार न करता रात्री मोफत जेवणाची व्यवस्था केली. यासोबतच आपल्या हॉटेलच्या परिसरात तसेच खोल्यांमध्ये मोफत राहण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली.

“आज पैशांपेक्षा माणुसकी महत्त्वाची आहे,” अशी भावना व्यक्त करत या हॉटेल व्यावसायिकांनी आलेल्या प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस केली. अनेक कार्यकर्त्यांनी या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अन्न, पाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था झाल्याने तणावपूर्ण वातावरणातही दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार म्हणजे आमचे सर्वस्व आहे असे म्हणत बारामतीकरांनी दाखवलेली ही एकजूट आणि सामाजिक जाणीव कौतुकास्पद ठरली. कठीण प्रसंगी एकमेकांच्या मदतीला धावून जाणे हीच खरी बारामतीची ओळख असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar Death Rumor: Baramati Shows Humanity, Offers Free Food

Web Summary : Following false news of Ajit Pawar's death, Baramati mourned. Businesses showed humanity by providing free food and shelter to stranded supporters, highlighting community spirit during the difficult time.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रhotelहॉटेलDeathमृत्यूPlane Crashविमान दुर्घटना