शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांचे निधन! बातमी कळताच युगेंद्र पवार ढसाढसा रडले, हसन मुश्रीफांनाही अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 10:47 IST

Ajit Pawar Death: अजित पवार यांचा बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू

Ajit Pawar Death, Yugndra Pawar Hasan Musrif Cried: महाराष्ट्राच्या राजकारणात आजची सकाळ फारच वाईट झाली. सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या आज बारामती येथे सभा होणार होत्या. त्या सभांसाठी आज सकाळी अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते. हे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना अपघात होऊन जवळच्या शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. DGCAने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच बारामती शोकसागरात बुडाले. युगेंद्र पवार आणि हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी भीषण अपघात झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. सकाळी त्यांच्या विमानाने बारामती विमान तळावर लँडींग केले. पण लँडींग करत असताना त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली. या बातमीने साऱ्यांनाच धक्का बसला. यादरम्यान, अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवारांची बातमी समोर येताच ते फोनवर बोलत असताना रडताना दिसले.

नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली व्हावी यासाठी अजित पवार यांनी जोर लावला होता. तसेच पुणे जिल्ह्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारyugendra pawarयुगेंद्र पवारHasan Mushrifहसन मुश्रीफPlane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघात