शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

पुरस्कार महत्त्वाचा की मतदारांचा विश्वास हा विचार लोकसभा निवडणुकीत व्हावा- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 9:42 PM

Ajit Pawar at Indapur Baramati: इंदापुरातील नगरपरिषदेच्या पटांगणात झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेत अजितदादांनी विरोधकांचा घेतला खरपूस समाचार

Ajit Pawar at Indapur Baramati: शैलेश काटे, लोकमत न्यूज नेटवर्क, इंदापूर-प्रतिनिधी: पंतप्रधान गृहमंत्र्यावर टीका करुन काहींना संसदरत्न मिळेल मात्र बारामती लोकसभा मतदार संघाला एक रुपयाचा निधी मिळणार नाही. त्यामुळे संसदरत्न पुरस्कार महत्वाचा की ज्या मतदारांचा विश्वास महत्वाचा हा विचार लोकसभा निवडणुकीत व्हावा, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या इंदापूरात झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेत आज (दि.५) केला. नगरपरिषदेच्या पटांगणात ही सभा झाली.

ते म्हणाले की, या सभेत सांगता सभा न म्हणता इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या शुभारंभाची सभा म्हणावी. त्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करुन लोकसभेत पाठवावे. गेल्या दहा वर्षात भिगवण व दौंड येथील रेल्वेसंदर्भातील प्रश्नांसंदर्भात बारामती लोकसभा मतदार संघातील बरेच प्रश्न मार्गी लागू शकले नाहीत. आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून राजकारण करतो.नकारात्मक दृष्टीने केलेले राजकारण फार काळ टिकत नाही.

विरोधकांनी केलेल्या आरोपांना समर्पक उत्तर देण्यासाठी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो. पाण्याचा प्रश्न सोडवणे,कालव्यातून तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचावे, बंधा-यांची कामे करावीत असे नियोजन करण्यात येत आहे, असे पवार म्हणाले. विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व आपण निधी देवूच. या खेरीज केंद्रातून ही निधी आणायचा आहे. त्यासाठी केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून जाणे लोकसभा मतदार संघातील तालुक्यांसाठी महत्वाचे आहे. विकासावर मत दिले नाही तर तुमची माझी पुढची पिढी जाब विचारल्याशिवाय रहाणार नाही, असे ही त्यांनी सांगितले.

सत्तर हजार कोटी रुपयांच्या कथित गैरकारभाराबाबतच्या आरोपांविषयी बोलताना ते म्हणाले की, मागेच बहुतेक शासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच एसीबीची क्लिनचीट मिळाली होती. देवेंद्र फडणवीस असताना ही क्लिनचीट मिळाली होती. या वेळी आ. दत्तात्रय भरणे, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर व इतरांची भाषणे झाली.

मी दम देत नाही, माझा फक्त आवाज चढतो!

मी कधी कोणाला दमदाटी करत नाही. सर्वसामान्यांसाठी आवश्यक असणारे काम अधिका-यांना अनेकदा सांगून होत नसेल तर मी दम देत नाही फक्त माझा आवाज चढतो.पण माझा आवाजच असा आहे त्याला मी काय करणार. शेवटी मला मिळालेली ती देणगी आहे.-अजित पवार

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Ajit Pawarअजित पवारbaramati-pcबारामतीIndapurइंदापूरSunetra Pawarसुनेत्रा पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस