शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ खेडलाच

By admin | Updated: October 25, 2015 03:48 IST

स्मार्ट पुण्यासाठीचे बहुचर्चित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ३पर्यायी जागांपैकी २ जागा खेड तालुक्यात व एक जागा खेडलगतच्या शिरूर तालुक्यातील

पुणे : स्मार्ट पुण्यासाठीचे बहुचर्चित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ३पर्यायी जागांपैकी २ जागा खेड तालुक्यात व एक जागा खेडलगतच्या शिरूर तालुक्यातील आहे. सध्या खेड, चाकण, तळेगाव आणि रांजणगाव एमआयडीसीची गरज लक्षात घेता केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत रविवारी पुण्यात होणाऱ्या बैठकीत विमानतळासाठी खेड तालुक्यातील जागेवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता असून जागेची पाहणी करण्यात येणार आहे.पुणे जिल्ह्यात येऊ घातलेल्या फॉक्सकॉनसारख्या परदेशी कंपन्यांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज प्रचंड वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आता गडकरी यांनी पुण्याच्या विमानतळासाठी पुढाकार घेतला आहे. शासनाने पुणे आणि लगतच्या जिल्ह्यातील औद्योगिक व कृषी विकासाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे १९९७ मध्ये हे विमानतळ राजगुरुनगरपासून जवळ असलेल्या चाकण येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (प्रतिनिधी)पुण्यातील लष्करी तळाला त्याचा अडथळा येत असल्याने शासनाने या जागेचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर खेड तालुक्यातच पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या शिरोली-चांदूस परिसरात विमानतळासाठी जागेचा सर्वे करण्यात आला.या जागेला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला, तसेच येथील डोंगराळ जागा विमानतळासाठी तांत्रिकदृष्ट्या गैरसोयीची असल्याचा अभिप्राय एअरपोर्ट अ‍ॅनॉरिटी आॅफ इंडियाने दिला. त्यामुळे पुन्हा नव्याने जागेचा शोध सुरू झाला.तांत्रिक समितीचा अभिप्रायकडूस-पाईट ही जागा विमानतळासाठी योग्य असलेल्याचा अभिप्राय तांत्रिक समितीने दिला आहे. परंतु, येथेदेखील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने राजगुरुनगरच्या पूर्वेस ‘सेझ’च्या जागेत विमानतळ करता येईल, असा प्रस्ताव पुढे आला आहे. परंतु या जागेसंदर्भात अनेक तांत्रिक अडचणी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.शासनाने खेड व चाकणशिवाय अन्य जागांचा पर्याय देण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु पुणे जिल्ह्यासह आणि लगतच्या जिल्ह्यातील औद्योगिक व कृषी विकासाच्या दृष्टीने विमानतळाची गरज लक्षात घेता प्रशासनाने खेड तालुक्यातीलच कडूस-पाईट आणि दावडी परिसरातील सेझचा प्र्रस्तावच नव्याने सादर केला आहे.शिरूर तालुक्यातील जागांची एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया आणि हवाई दलाच्या उच्चपदस्थांनी पाहणी करून तांत्रिक अहवाल सादर केला आहे. याबाबत नितीन गडकरी यांच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.