शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

झोपमोड केल्यामुळे शिक्षकाने मुलीच्या कानफटात लगावली

By admin | Updated: July 10, 2015 02:32 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चक्क वर्गातच दिवसा झोपलेल्या शिक्षकाची झोपमोड झाल्याने त्याने दुसरीतील एका मुलीच्या जोरदार कानफटात मारली.

कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील माळवदेवस्तीत सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चक्क वर्गातच दिवसा झोपलेल्या शिक्षकाची झोपमोड झाल्याने त्याने दुसरीतील एका मुलीच्या जोरदार कानफटात मारली. त्यामुळे मुलीच्या गालावर उठलेला वण दुसऱ्या दिवशीही कायम होता.घाबरलेली ही मुलगी रात्री उशिरापर्यंत शाळेतून घरी न आल्याने पालकांनी तिचा शोध घेतला असता ती सापडली़; पण तिच्या गालावर उठलेले माराचे वण पाहून पालकांनी तिला विचारले असता हा प्रकार उघड झाला़ मुलीच्या पालकांनी स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास बच्चे, सदस्य काशिनाथ माळवदे, उत्तम जाधव यांना बुधवारी (दि. ८) घडलेल्या प्रकाराची माहिती दिली़ माळवदेवस्ती (कवठे येमाई) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घडलेल्या मारहाण प्रकाराबाबत स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास बच्चे व ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात या शिक्षकाच्या शालेय कामकाजाबाबत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे. संजय वसंत बागले हे २००६ पासून या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून, शाळेत अवेळी येणे, दुपारी वर्गातच पथारी टाकून झोपणे, मुलांनी पालकांना सांगितल्यास मुलांनाच चोप देणे असे प्रकार सातत्याने करीत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. या शिक्षकाबाबत केंद्रप्रमुखांकडे ३ वर्षांपासून सातत्याने तक्रार करूनही केंद्रप्रमुख व शिक्षण विभागाचे अधिकारी या प्रश्नी पांघरूणच घालण्याचे काम करीत आहेत. काल मारहाण झाल्यानंतर आज दिवसभर मुलीचा गाल सुजलेलाच असल्याचे पालकांनी सांगितले.या शिक्षकाची येथून तातडीने बदली करण्यात यावी; अन्यथा सदर शाळेस टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ व गटशिक्षणाधिकारी अर्जुन मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता केंद्र प्रमुखांना या प्रकरणी तातडीने अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यानंतरच याबाबत कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. आज शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख व पोलिसांनीही या शाळेला भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी मुलीचे पालक सुदाम माळवदे व स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास बच्चे आणि ग्रामस्थांनी या प्रश्नी संयमाची भूमिका घेऊन या बेजबाबदार शिक्षकाची येथून तातडीने बदली करण्याची मागणी केली.(वार्ताहर)