शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

कुकडी प्रकल्पातून अखेर आवर्तन थांबविले, १०.६६ टीएमसी पाणी सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 00:23 IST

कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या ५ धरणांतून कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार ६.२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता

ओझर : कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या ५ धरणांतून कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार ६.२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता, त्यानंतर पुन्हा समितीने अतिरिक्त जादा पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन प्रत्यक्षात १०.६६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. २५ वर्षांत प्रथमच ६२ दिवसांनंतर आवर्तन शुक्रवारी शेतकऱ्यांच्या वाढत्या विरोधानंतर थांबविण्यात आले. पिंपळगाव जोगा कालव्यातून शनिवारी (दि. २२) सकाळी पाणी बंद करण्यात आले. प्रथमच इतक्या मोठ्या दिवसांचे आणि दोन आवर्तन इतके सोडण्यात आलेले असल्याने उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. पाण्याचे नियोजन कोलमडल्याने जुन्नर तालुक्यात विरोधी पक्षाने पाण्याचे राजकारण करून लोकप्रतिनिधी यांना वेठीस धरण्यास सुरुवात केल्याने कुकडीचा पाणीप्रश्न पेटणार आहे, अशी चिन्हेदिसत आहेत.कालवा सल्लागार समितीची बैठक ३ आॅक्टोबर २०१८ ला होऊन कुकडी प्रकल्पातून २० आॅक्टोबरपासून नदीद्वारे आणि २५ आॅक्टोबर २०१८ पासून कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर कालवा समितीची १६ आॅक्टोबर २०१८ रोजी दुसरी बैठक होऊन जादा पाणी सोडण्याचा निर्णय झाला. यात ५५ दिवसांचे आवर्तन सोडण्याचे ठरले. मात्र प्रत्यक्ष ६२ दिवसांनंतर पाणी बंद करण्यात आल्याने इतक्या मोठ्या आवर्तनात तब्बल १०.६६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. ४.४६ टीएमसी पाणी जादा सोडण्यात आल्याने आता धरणात अवघे १०.५४ टीएमसी पाणी शिल्लक आहे.सर्वाधिक पाणीसाठा डिंभे धरणात शिल्लक आहे. या धरणात ६.८९ टीएमसी पाणीसाठा आहे. मात्र उर्वरित दिवसांत ६० टक्केच पाणी उपयोगी पडणार असून ४० टक्के पाण्याची घट होणार असल्याने त्याचा फटका उन्हाळ्यात बसणार आहे. कुकडी पाटबंधारे विभागाच्या निष्क्रियतेमुळे प्रथमच जुन्नर तालुक्यासह आंबेगाव, शिरूर आणि पारनेर, कर्जत, श्रीगोंदा, करमाळा या तालुक्यांना पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कुकडी प्रकल्पातून २० आॅक्टोबर २०१८ पासून सोडण्यात आलेल्या ९.३५२ टीएमसी पाण्यापैकी कुकडी डाव्या कालव्यातून सर्वाधिक ६.८०१ सोडण्यात आले. घोड शाखा कालव्यातून ०.१६८ टीएमसी, डिंभा उजवा कालव्यातून ०.९०९ टीएमसी, पिंपळगाव जोगा डावा कालव्यातून ०.९३७ टीएमसी, मीना पूरक कालव्यातून ०.००९ टीएमसी आणि मीना शाखा कालव्यातून ०.५२८ टीएमसी पाणी व नदीद्वारे कुकडी नदीला ०.५९१ टीएमसी, वडज धरणातून मीना नदीला ०.१८९ टीएमसी, डिंभे धरणातून घोड नदीला ०.५२८ टीएमसी असे एकूण १०.६६ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.उन्हाळयात जाणवणार तीव्र पाणीटंचाईसध्या येडगाव धरणात ०.२४४ टीएमसी, वडज धरणात ०.५३२ टीएमसी, माणिकडोह धरणात १.४९१ टीएमसी, पिंपळगाव जोगा १.३८८ टीएमसी, डिंभा धरणात ६.८९१ टीएमसी असे एकूण १०.५४६ टीएमसी (३५.५३ टक्के) पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षी आजअखेर २६.६४३ टीएमसी (८७.२५ टक्के) पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५२.७२ टक्के पाणी कमी झाले असून इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याचा अजब निर्णय झाला आहे.दोन आवर्तन इतके पाणी आणि ६२ दिवसांचे आवर्तन २५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच झालेले आहे. पाटबंधारे अधिकाºयांचे नियोजन फसल्याने आणि नियोजनाचा अभाव यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. यामुळे पाटबंधारे अधिकारी यांची चौकशी करावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे. अधिकाºयांच्या निष्क्रियतेमुळे राजकीय वातावरण तप्त होणार असल्याने पाणीप्रश्न पेटणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.पाणी खाली जात असताना विरोधकांनी गप्प बसण्याची भूमिका ठेवून पाणी खाली गेल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू केल्याने शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 

टॅग्स :DamधरणPuneपुणे