पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 16:36 IST2025-05-01T16:28:41+5:302025-05-01T16:36:49+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील एक तरुण नोकरीसाठी पुण्यात आला. त्याने इन्स्टाग्रामवरून एका तरुणीसोबत मैत्री केली आणि नंतर असं काही केलं की प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत केलं.

After arriving in Pune, he convinced a young woman from Mumbai and had sex with her; later, he had sex with her friend... | पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...

पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...

Pune news: लग्न होत नसल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडणाऱ्या तरुणांची संख्या राज्यभर वाढत असताना कारंडेवाडीच्या ओंकार प्रधान या पठ्याच्या आयुष्यात मात्र दोन-दोन तरुणी आल्या. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणाने आधी मुंबईच्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. लग्नाचं वचन देऊन तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर तिच्या मैत्रिणीला पटवलं आणि लग्न केलं. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नोकरीच्या निमित्ताने सध्या पुण्यात राहणारा ओंकार उत्तम प्रधान (वय २२, मूळ रा. कारंडेवाडी, ता. करवीर) याने लग्नाचे आमिष दाखवून, प्रेमाच्या आणाभाका घेत एका मैत्रिणीशी शरीरसंबंध ठेवले. मात्र, काही दिवसांत तिला सोडून तिच्याच मैत्रिणीसोबत पळून जाऊन लग्न केले. 

वाचा >>कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

हा प्रकार लक्षात येताच पहिल्या प्रेयसीने कोडोली पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी अटक केल्याने ओंकारची वरात थेट पोलिस ठाण्यात पोहोचली.

पुण्यात आला अन् मुंबईतील मुलीसोबत मैत्री

जेमतेम १२वीपर्यंत शिक्षण झालेल्या ओंकारने तीन वर्षापूर्वी गाव सोडून पुणे गाठले. तिथे एका कंपनीत काम मिळाले. इन्स्टाग्रामवरून मुंबईतील एका तरुणीशी त्याची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 

प्रेमाच्या आणाभाका घेऊन तिला संसाराची स्वप्ने दाखवली. नातेवाईकांची परवानगी घेऊन आपण लग्न करू, असे आमिष दाखवून त्याने तिच्याशी पन्हाळा, हडपसर, पुणे येथे शरीरसंबंध ठेवले.

तरुणीला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या 

गर्भधारणा झाल्यानंतर गोळ्या देऊन गर्भपात केला. दरम्यानच्या काळात त्याने प्रेयसीच्या मैत्रिणीशी सूत जुळवले आणि आठवड्यापूर्वी पळून जाऊन लग्नही केले. हा प्रकार लक्षात येताच पहिल्या प्रेयसीने करवीर पोलिस ठाण्यात धाव घेतली. 

तिघांमधील संबंध ऐकून नातेवाइकांना धक्का

ओंकारचे आणि त्याच्या दोन्ही मैत्रिणींचे नातेवाइक अल्पशिक्षित आहेत. प्रेमाच्या त्रिकोणाने घडलेल्या प्रकाराने तिघांचेही नातेवाईक पोलिस ठाण्यात आले होते. नोकरीतून चार पैसे मिळावेत, यासाठी घर सोडून गेलेल्या मुलांनी केलेला पराक्रम पाहून नातेवाईकांना धक्का बसला.

Web Title: After arriving in Pune, he convinced a young woman from Mumbai and had sex with her; later, he had sex with her friend...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.