मातीच्या ढिगाऱ्याखालील मजुरांचे मृतदेह ७० तासांनी बाहेर काढले; इंदापूरकरांनी रुग्णवाहिका अडवली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 03:05 PM2023-08-04T15:05:44+5:302023-08-04T15:06:46+5:30

दोषींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत जाऊ देणार नाही; नातेवाईक रुग्णवाहिकेसमोर ठाण मांडून

After 70 hours, the bodies of the laborers were recovered from the rubble; Indapurkar blocked the ambulance | मातीच्या ढिगाऱ्याखालील मजुरांचे मृतदेह ७० तासांनी बाहेर काढले; इंदापूरकरांनी रुग्णवाहिका अडवली

मातीच्या ढिगाऱ्याखालील मजुरांचे मृतदेह ७० तासांनी बाहेर काढले; इंदापूरकरांनी रुग्णवाहिका अडवली

googlenewsNext

म्हसोबाचीवाडी : ता.इंदापूर येथील विहिरीची रिंग तयार करत असताना मातीचा ढिगारा ढासळून त्याखाली गाडले गेलेल्या ४ मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात एन डी आर एफ पथकाला ७० तासांनंतर यश मिळाले. ७० तास उलटून गेल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत मजूर मिळण्याची आशा मावळली होती. आणि प्रत्यक्षात तेच वास्तव समोर आले. मृतदेह बाहेर काढताच मृतांच्या नातेवाइकांनी न्याय मिळाल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नसल्याचे प्रशासनाला सांगितले.

म्हसोबावाडी येथे खडी क्रेशर साठी दगड काढून त्याठिकाणी झालेल्या अक्राळविक्राळ खड्याला विहिरीचे रूप देऊन रिंग टाकण्याचे काम सुरु होते. तर हे काम करताना कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे रिंग बांधताना ४ मजूर मातीच्या खाली गाडले गेले होते. त्यांना जिवंत काढण्यासाठी एन.डी आर एफ पथक गेल्या दोन दिवसापासून अविरत पणे काम करीत होते. मात्र अनेक प्रयत्न करूनही मजूर ज्या ठिकाणी गाडले गेले होते. त्या ठिकाणी पोहोचता येत नव्हते. अखेर पूर्व बाजूला सुरु केलेले खोदकाम थांबवून दुसऱ्या बाजूला रप्म तयार करून मशीन खाली उतरवण्यात आल्या. आणि तब्बत ७० तास उलटून गेल्यावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका कामगाराचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर शोधकार्य सुरु ठेवून ३ मजुरांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. मृतदेह बाहेर काढताच नातेवाईक यांनी हंबरडा फोडून रडण्यास सुरवात केली. त्यामुळे तेथील वातावरण अगदी रडण्या ओरडण्याच्या आवाजाने भारून गेलेले दिसून आले.

मृतदेह रुग्णवाहिकेमध्ये ठेवताच मजुरांच्या नातेवाइकांनी वाहन अडवून जोपर्यंत यातील दोषींना अटक करून न्याय मिळत नाही. तो पर्यंत मृतदेह हलवू देणार नसल्याचे सांगितले. तर विहीर मालकावर तसेच रिंगच्या कंत्राटदार याच्यावर गुन्हा नोंद करून भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. तर हा अपघात होता कि घातपात याची चौकशी करण्याची मागणी समोर येत आहे.

Web Title: After 70 hours, the bodies of the laborers were recovered from the rubble; Indapurkar blocked the ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.