बेमुदत आंदोलनाचा वकिलांचा निर्णय

By Admin | Updated: June 25, 2015 03:29 IST2015-06-25T03:29:51+5:302015-06-25T03:29:51+5:30

: मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात स्थापन करण्याच्या मागणीसाठी पुणे आणि पिंपरी न्यायालयातील वकिलांनी बुधवारी झालेल्या बैठकीत बेमुदत बंदचा

Advocates of uncontrollable agitation | बेमुदत आंदोलनाचा वकिलांचा निर्णय

बेमुदत आंदोलनाचा वकिलांचा निर्णय

पिंपरी : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात स्थापन करण्याच्या मागणीसाठी पुणे आणि पिंपरी न्यायालयातील वकिलांनी बुधवारी झालेल्या बैठकीत बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे. बैठकीला पुणे आणि पिंपरी अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या बंदमध्ये सुमारे ८०० वकील सहभागी होणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील विविध न्यायालयांमधील कामकाजात सहभाग न घेण्याचा निर्णय वकिलांनी घेतला. शुक्रवारी (दि. १९) वकिलांनी आंदोलन केले. आंदोलनाच्या सहाव्या दिवशी जोपर्यंत मागणीची दखल घेतली जात नाही, तोपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय पुण्यात झालेल्या बैठकीत वकील संघटनेने घेतला. पुणे आणि औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्याबाबतचा ठराव १९७८ मध्ये विधिमंडळात मंजूर झाला आहे. त्यानुसार औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू झाले आहे. ठरावाला २५ हून अधिक वर्षे उलटून गेली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Advocates of uncontrollable agitation