शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे हायवेवरील घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे; महामार्गावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पर्यायी रस्ते उपलब्ध करून देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:26 IST

टँकरमधून बाहेर पडणारा गॅस ज्वलनशील होता, त्यामुळे प्रशासनाला तिथे काही करता येत नव्हते - जिल्हाधिकारी

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी प्रोपेलीन गॅस घेऊन जाणारा टँकरचा अपघात झाला. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक लोणावळा येथे थांबविण्यात आली होती. त्यामुळे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. या अपघातात तज्ज्ञांच्या पथकाशिवाय काहीच करता येत नव्हते. या घटनेचा अहवाल तयार करून चौकशी केली जाईल. मात्र भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक काळजी घेतली जाईल, पर्यायी व्यवस्थाही उभी केली जाईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

द्रुतगती महामार्गावर अपघात होतात, मात्र अपघाताच्या घटनेनंतर अर्ध्या तासात मदत पोहोचते. मात्र गॅस टँकरच्या अपघाताची घटना वेगळी होती. टँकरमधून बाहेर पडणारा गॅस ज्वलनशील होता, त्यामुळे प्रशासनाला तिथे काही करता येत नव्हते. त्यासाठी तज्ज्ञांच्या पथकाची आवश्यकता होती. हे पथक आल्यानंतर अतिशय काळजीपूर्वक हे काम करण्यात आले. मात्र भविष्यात अशा घटना घडू नयेत, याची जिल्हाधिकारी प्रशासनाकडून पुरेपूर काळजी घेतली जाईल. तसेच या घटनेचा सविस्तर अहवालही आम्ही तयार करून त्याची चौकशी करत आहोत असे जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

महामार्गावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पर्यायी रस्ते उपलब्ध करून देणार

दक्षिण भारतातून येणाऱ्या वाहनचालकांना त्याविषयी काही जागृती करता येईल का? त्याचबरोबर, अशा घटना घडल्यानंतर महामार्गावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पर्यायी रस्ते कसे उपलब्ध करून देता येतील, याचा विचार जिल्हा प्रशासन करत आहे, असे जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai-Pune Highway Incident Prompts Action: Water, Restrooms, Alternate Routes Planned

Web Summary : Following a gas tanker accident on the Mumbai-Pune Expressway, authorities are investigating. Focus is now on providing drinking water, restrooms, and alternate routes for commuters to prevent future disruptions and improve safety.
टॅग्स :PuneपुणेMumbai Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेAccidentअपघातTrafficवाहतूक कोंडीhighwayमहामार्गcarकारcollectorजिल्हाधिकारी