शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी प्रशासनाला मिळेना कर्मचारी

By admin | Updated: January 24, 2017 01:39 IST

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना कार्यालयेदेखील देण्यात आली आहेत. परंतु सध्या निवडणूक कामासाठी कर्मचारीच नियुक्त न केल्याने निवडणूक कामांचा खोळंबा झाला आहे.राज्य निवडणूक आयोगाने यावेळी प्रथमच दोन्ही महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका एकाच वेळी घेतल्या आहेत. या तीनही निवडणूक कामांसाठी तब्बल ५६ हजार कर्मचा-यांची गरच आहे. यामध्ये जिल्हा परिषद व १३ पंचायत समित्यांसाठी तब्बल २४ हजार कर्मचा-यांची गरज आहे. पुणे महापालिकेसाठी २० हजार आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी १२ हजार कर्मचा-यांची गरज आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, शासकीय शाळांमधील शिक्षक आदी सर्व कर्मचारी हाताशी असल्याने कर्मचा-यांची कमतरता नाही. पण पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी १२ हजार कर्मचा-यांची आवश्यकात असून, सध्या त्याच्याकडे साडेआठ हजार कर्मचारी आहेत. यामुळे त्यांनी शिरुर, आंबेगाव तालुक्यातील काही कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. पुणे महापालिकेसाठी पाच ते सहा हजार कर्मचारी बाहेरचे घ्यावे लागणार आहेत. या दोन्ही महापालिकांना कर्मचा-यांची चणचण भासत आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने ग्रामीण भागातील कर्मचा-यांची मागणी केली आहे. परंतु ग्रामीण भागातील बहुतेक सर्व कर्मचारी जिल्हा परिषदेसाठीच लागणार असल्याने हे कर्मचारी देण्यास जिल्हाधिका-यांनी नकार कळविला आहे. महापालिका निवडणुकीसाठी तीन प्रभागांसाठी एका उपजिल्हाधिका-यांची निवडणूक निर्णय अधिकारी व प्रत्येक प्रभागासाठी एक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या करून आठ दिवस झाले आहे. पण निवडणुकीसाठी आवश्यक असलेला कर्मचारीच अद्याप नियुक्त न केल्याने निवडणुकीच्या कामाची पूर्व तयारी करण्यासाठी अधिका-यांची मोठी अडचण झाली आहे. कार्यालयात जाऊन काय करायचा असा प्रश्न देखील अनेक अधिका-यांना पडला आहे. यामुळे महापालिकांना त्यांच्याच हद्दीतील खाजगी अस्थापनावरील कर्मचारी निवडणूक कामासाठी घ्यावे लागणार असल्याची चर्चा आहे.