खासगी कारमधून प्रवासी वाहतूक केली तर कारवाई, ‘आरटीओ’ कडून सहा पथके तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 09:42 IST2025-01-09T09:41:53+5:302025-01-09T09:42:26+5:30

मोटार वाहन कायद्यानुसार खासगी कारमधून प्रवासी वाहतूक करणे बेकायदा आहे

Action will be taken if passengers are transported in private cars six teams have been formed by the RTO | खासगी कारमधून प्रवासी वाहतूक केली तर कारवाई, ‘आरटीओ’ कडून सहा पथके तयार

खासगी कारमधून प्रवासी वाहतूक केली तर कारवाई, ‘आरटीओ’ कडून सहा पथके तयार

पुणे : खासगी कारमधून प्रवासी वाहतूक करणे मनाई आहे. परंतु अनेक खासगी कारचालक बिनधास्तपणे प्रवासी वाहतूक करत आहेत. यामुळे तक्रारी वाढल्यानंतर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) अशा खासगी वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. खासगी कारमधून अवैधपणे वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत.

अनेकांनी बाहेरून पुण्यात आणि पुण्यातून बाहेरगावी जात असतात. अशा वेळी कारमध्ये जागा असेल तर प्रवासी वाहतूक करण्यात येते. शिवाय ये-जा करणाऱ्यांकडून कार शेअरिंगसाठीचे एका खासगी ॲपच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते. संबंधित वाहनचालक पुण्यातून कोणत्या शहरात जाणार आहे आणि त्याच्या कारमध्ये किती जागा आहे, त्या ॲपवर टाकतो. त्यानुसार प्रवास करणारे नागरिक त्या कारमधील सीटची ऑनलाइन बुकिंग त्या ॲपवरून करतात. मोटार वाहन कायद्यानुसार खासगी कारमधून प्रवासी वाहतूक करणे बेकायदा आहे. तरीही ॲपच्या माध्यमातून ही वाहतूक वाढल्याच्या तक्रारी पुणे आरटीओकडे आल्या होत्या. त्यामुळे पुणे आरटीओने खासगी कारमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

ही ठिकाणी निवडले आहेत

आरटीओकडून शहरातील वाघोली, विमानगर, हडपसर, स्वारगेट, चांदणी चौक, नवले पूल, अशी गर्दी ठिकाणे निवडून कारवाई करण्यात येत आहे. शिवाय आरटीओकडून वायुवेग पथकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. वायुवेग पथकांतील कर्मचाऱ्यांनी स्वतः डमी प्रवासी म्हणून खासगी ॲपवरून बुकिंग करावे. त्यामध्ये सर्व पुरावे गोळा करण्यात येत आहे. खासगी कारमधून प्रवासी वाहतूक केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे, असे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Action will be taken if passengers are transported in private cars six teams have been formed by the RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.