मद्यापन करून वाहन चालवणाऱ्यांवर होणार कारवाई; थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर आरटीओची मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:24 IST2025-12-24T15:23:29+5:302025-12-24T15:24:27+5:30
आरटीओकडून ३१ डिसेंबरपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असून यासाठी आठ सुरक्षा पथके तयार केली आहेत

मद्यापन करून वाहन चालवणाऱ्यांवर होणार कारवाई; थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर आरटीओची मोहीम
पुणे: पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर मद्यापन करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईला सुरुवात केली आहे. आरटीओकडून ३१ डिसेंबरपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे. यासाठी आठ सुरक्षा पथके तयार केली असून, त्यांच्यामार्फत ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी केली जाणार आहे.
नवीन वर्षाच्या स्वागताला अनेकजण पार्ट्यांचे नियोजन करतात. नवीन वर्षाच्या अगोदर ख्रिसमस सण असून, नागरिक मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे विनाकारण इतरांच्या जीविताला धोका निर्माण होते. त्यामुळेच राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाकडून सर्व प्रादेशिक परिवहन विभागांना थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे आरटीओने पोलिसांच्या मदतीने वेगवेगऱ्या भागात वाहनांची तपासणी सुरू केली आहे. ब्रेथ अॅनालायझरच्या मदतीने वाहन चालकांची तपासणी केली जात आहे. मद्यपान करून वाहन चालवताना आढळून आल्यास कारवाई केली जात आहे. पुणे आरटीओकडून त्यासाठी आठ रस्ता सुरक्षा पथके तयार केली आहे. ही पथके स्थानिक पोलीस ठाण्याच्या संपर्कात राहून कारवाईचे निर्देश आरटीओकडून देण्यात आले आहेत. रात्री साडेअकरा ते पहाटे चार दरम्यान ही करवाई करावी, अशा स्पष्ट सूचना पथकांना देण्यात आल्या आहेत. ही कारवाई ३१ डिसेंबरपर्यंत विविध भागातील रस्त्यांवर केली जाणार आहे. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.