शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीच्या ‘त्या’ नगरसेवकांवर कारवाई

By admin | Updated: February 4, 2015 00:28 IST

अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याने आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर नगरसेवक राहुल चितळकर आणि प्रशांत कुऱ्हाडे यांनी चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला.

पुणे : अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याने आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर नगरसेवक राहुल चितळकर आणि प्रशांत कुऱ्हाडे यांनी चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला. यामुळे नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या कलम ४४ नुसार दोन्ही नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले. दरम्यान, आळंदी परिसरात अन्य लोकप्रतिनिधींनी केलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्याचे आदेश पाटील यांनी दिले आहेत.वेळेवर कामे होत नसल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर व नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे यांनी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर चाकूने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला़ याप्रकरणी पोलिसांनी राहुल चितळकर, प्रशांत कुऱ्हाडे व अन्य चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, ते पळून गेले आहेत़ माझ्यावर सोपविलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडताना व उच्च न्यायालयाने वेळोवेळी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांबाबत दिलेल्या आदेशाचे पालन करताना शासकीय कामात अडथळा आणून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. नागरी अधिनियम १९६५ चे कलम ४२ अन्वये त्या दोघांचे सदस्यपद रद्द करावे, अशी मागणी औंधकर यांनी नगरविकास मंत्रालयाला निवेदन देऊन केली होती. औंधकर यांनी तीर्थक्षेत्र आराखड्यानुसार बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाच्या शेजारील अनधिकृत मंदिराचे बांधकाम थांबविण्यास सांगितले होते़ तेथे गेलेले आरोग्य कर्मचारी रमेश थोरात यांना चितळकर यांनी शिवीगाळ केली होती़ याचाच राग मनात धरून चितळकर आणि कुऱ्हाडे यांनी औंधकर यांच्यावर खुनीहल्ला केला. ४आळंदी नगरपालिकेच्या क्षेत्रात अन्य अनेक लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन पाटील यांनी आळंदी परिसरातील प्रामुख्याने लोकप्रतिनिधींनी केलेल्या अतिक्रमणांची चौकशी करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.