शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

बाणेरमधील जागा बळकावल्याप्रकरणी कारवाई क रा

By admin | Updated: April 11, 2015 05:23 IST

बाणेरमधील महापालिकेच्या मालकीची पाण्याची टाकी परस्पर पाडून पावणेदोन गुंठे जागा शेजारच्या जागामालकांनी बळकाविल्याच्या प्रकरणाची चौकशी,

पुणे : बाणेरमधील महापालिकेच्या मालकीची पाण्याची टाकी परस्पर पाडून पावणेदोन गुंठे जागा शेजारच्या जागामालकांनी बळकाविल्याच्या प्रकरणाची चौकशी, तपासणी तातडीने पार पाडून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश स्थायी समिती व शहर सुधारणा समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत प्रशासनाला देण्यात आले.पत्रव्यवहार, नोटिसा असे कागदोपत्री घोडे नाचवत न बसता तातडीने कारवाई करण्याचे आदेश या वेळी देण्यात आले. बाणेरमधील महापालिकेच्या मालकीची जागा बळकावण्यात आल्याचे प्रकरण गुरुवारी ‘लोकमत’ने उजेडात आणले. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती व शहर सुधारणा समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा मुद्दा सदस्यांनी उपस्थित करून प्रशासनाकडे माहिती मागितली. पुराव्यानिशी प्रकरण उजेडात येऊनही हा विषय आमच्या खात्याशी संबंधित नाही, अशी भूमिका घेऊन जबाबदारी झटकली जात होती. त्याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यात आला.बाणेरमधील संबंधित जागेसंदर्भात संपूर्ण चौकशी करून कारवाई अहवाल सोमवारपर्यंत देण्याचे आदेश स्थायी समितीने प्रशासनाला दिले असल्याचे स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी सांगितले. पत्र्यव्यवहार करीत कागदी घोडे नाचवत न बसता तातडीने कारवाई करण्यास सांगण्यात आल्याचे शहर सुधारणा समितीच्या अध्यक्ष रूपाली पाटील-ठोंबरे यांनी सांगितले.बाणेर गाव १९९७मध्ये महापालिकेत समाविष्ट झाले, त्याबरोबर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या इमारती, शाळा, मोकळी जागा या महापालिकेकडे हस्तांतरित झाल्या. त्यानुसार तुकाई मंदिराच्या पायथ्याशी असलेली पाण्याची टाकी व पावणेदोन गुंठे जागा पालिकेकडे हस्तांतरित झाली होती. मात्र, दोन महिन्यांपूर्वी ती टाकी पाडून शेजारच्या जमीनमालकांनी त्यावर अतिक्रमण केले आहे. या पाण्याचा टाकीचा वापर बंद झाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने ही जागा मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतरित करणे आवश्यक होते. त्या ठिकाणी कंपाऊड टाकून महापालिकेची मालकी दर्शविणे आवश्यक असताना त्याकडे लक्ष दिले गेले नाही.