शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई

By admin | Updated: August 31, 2016 00:56 IST

गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेच्या समोर नो पार्किंगच्या ठिकाणी रस्त्यावर उभ्या केलेल्या आलिशान गाड्यांना जॅमर लावून दंड वसुलीची कारवाई सलग दुसऱ्या

पिंपरी : गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेच्या समोर नो पार्किंगच्या ठिकाणी रस्त्यावर उभ्या केलेल्या आलिशान गाड्यांना जॅमर लावून दंड वसुलीची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही पिंपरी वाहतूक शाखेने सुरू ठेवली होती़ पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ७ ते ८ मोटारगाड्यांना जॅमर लावून दंड वसूल केला़ महापालिकेच्या समोर असलेल्या रस्त्यावर नेहमी मोटारगाड्यांची पार्किंग केलेली असते़ शहरातील अनेक राजकीय पदाधिकारी, नागरिक विविध कामांसाठी पालिकेत येतात़ परंतु, पालिकेच्या आवारात मोटारगाड्यांना पार्किंग करायला जागा मिळाली नाही, तर त्यांच्याकडून रस्त्यावर मोटारगाड्या पार्क केल्या जातात़ मात्र, दोन दिवसांपासून पिंपरी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा कडक बडगा उगारत नो पार्किंगच्या ठिकाणी लावलेल्या आलिशान मोटारगाड्यांना जॅमर लावून कारवाई केली जात आहे़गणेशोत्सव जवळ आल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक विभागाच्या वरिष्ठांकडून सक्त सूचना करण्यात आल्या आहेत़ त्यानुसार नो पार्किंगचा दंड दोनशे रुपयांऐवजी चारशे रुपये केला आहे़ जर नो पार्किंगमध्ये मोटारगाडी पार्क करून ड्रायव्हर गाडीत असेल, तर दोनशे रुपयांच्या दंडाची तरतूद नवीन वाहन कायद्यानुसार करण्यात आली आहे़ महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवेळेस मोटारगाड्यांची गर्दी होत असते़ त्याचे नियोजन कर्मचाऱ्यांकडून केले जाते. मात्र, अनेक वाहनचालकांकडून पालिका वगळता दुसऱ्या ठिकाणी मोटारगाडी पार्क करण्यासाठी टाळाटाळ केली जाते़ हे वाहनचालक रस्त्यावरच मोटारगाड्यांची पार्किंग करतात़ मागील काही दिवसांपूर्वी वाहतूक विभागाकडे जॅमर उपलब्ध झाल्यामुळे कारवाईचा वेग वाढला आहे़.