शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

डासोत्पतीच्या बांधकामांवर कारवाई

By admin | Updated: July 15, 2014 03:55 IST

शहरात डेंगी, मलेरियाने थैमान घातल्याने हैराण झालेल्या पुणे महापालिकेने डेंगी निर्मूलनासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

पुणे : शहरात डेंगी, मलेरियाने थैमान घातल्याने हैराण झालेल्या पुणे महापालिकेने डेंगी निर्मूलनासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात धनकवडी, कोथरूड, भवानी पेठ, विश्रामबाग, औंध, नगर रस्ता या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये डासांची मोठी प्रमाणात उत्पत्ती होत असल्याचे दिसून आले आहे. बांधकाम सुरू असलेल्या २२९ ठिकाणी डासांची पैदास होत असल्याच्या कारणांवरून त्यांच्या मालकांना नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली आहे. विशेष मोहिमेअंतर्गत १ ते ७ जुलै या काळात केलेल्या तपासणीत ही आकडेवारी समोर आली आहे. या काळात शहरात १ हजार ४५८ डासांची उत्पत्तिस्थाने आढळून आली. त्यापैकी १२३० ठिकाणी औषध फवारणी करून डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करण्यात आली, तर डेंगीचे डास आढळलेल्या २२९ बांधकामांना नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, डासांची उत्पत्तिस्थाने शोधण्याच्या मोहिमेमध्ये धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्वाधिक २९० ठिकाणी डासांची उत्पत्तिस्थाने आढळली आहेत. त्यापाठोपाठ भवानी पेठ, टिळक रोड येथे प्रत्येकी १७० ठिकाणे, औंध येथे ११६, विश्रामबाग येथे १२८ ठिकाणी डेंगीच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले आहे. सर्वेक्षणात सुमारे तीन लाख घरांना भेटी देण्यात आल्या. डासोत्पत्ती होत असलेल्या ठिकाणी औषध फवारणी, धूर फवारणीसारख्या उपाययोजना केल्या आहेत. शहरातील ३१० रुग्णालयांमधून डेंगीच्या पेशंटची माहिती पालिकेला कळविण्यात येते, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)