तडीपार गुंडास दत्तवाडी पोलिसांनी केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 09:25 PM2018-09-20T21:25:47+5:302018-09-20T21:26:22+5:30

तडीपार असताना शहरात आलेल्या कुख्यात गुंडास दत्तवाडी पोलिसांनी जेरबंद केले.

accussed arrested by Dattawadi police | तडीपार गुंडास दत्तवाडी पोलिसांनी केले जेरबंद

तडीपार गुंडास दत्तवाडी पोलिसांनी केले जेरबंद

Next
ठळक मुद्देएक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा २५ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त

पुणे : तडीपार असताना शहरात आलेल्या कुख्यात गुंडास दत्तवाडी पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा २५ हजार ७०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.आनंद ऊर्फ बारक्या गणपत जोशी (वय २८, रा़ पर्वती) असे त्याचे नाव आहे़. 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, जोरी हा पर्वती दर्शन भागातील कुख्यात गुंड आहे. त्याला पोलिसांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. तरीही तो शहरात आला असून मित्र मंडळ चौकातील लोकमान्य रुग्णालयाच्या बाजूच्या रस्त्यावर उभा आहे. त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती पोलीस नाईक सुधीर घोटकुले आणि पोलीस शिपाई रोहन खैरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री त्या ठिकाणी जाऊन जोरी याला पकडले़. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ, पोलीस हवालदार तानाजी निकम, पोलीस नाईक सुधीर घोटकुले, महेश गाढवे, सोमा यादव, पोलीस शिपाई रोहन खैरे, सागर सुतकर, विकास कदम, शरद राऊत, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर यांनी ही कारवाई केली. हवालदार तानाजी निकम तपास करत आहेत.

Web Title: accussed arrested by Dattawadi police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.