दुसरे लग्न; पत्नीचा खून करून पती थेट पोलीस ठाण्यात हजर, हडपसर भागातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:42 IST2025-05-23T12:42:01+5:302025-05-23T12:42:25+5:30
पत्नीचे आरोपीसोबत दुसरे लग्न झाले असून काही वादातून त्याने खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे

दुसरे लग्न; पत्नीचा खून करून पती थेट पोलीस ठाण्यात हजर, हडपसर भागातील घटना
पुणे : पुण्याच्या हडपसर भागात दुसरे लग्न झालेल्या तरुणीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने तरुणीचा गळा दाबून खून केला. व नंतर तो स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आहे. अनिता लोंढे (वय २७ वर्षे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी राहुल शिवाजी मिसाळ याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत भंडलकर नगर शेवळवाडी येथे खुनाची घडली आहे. अनिताचे आरोपी राहुल सोबत दुसरे यालग्न झाले होते. ते दोघे नवरा बायको असून एकत्र राहत होते. राहुलने अनिता हिचा गळा दाबून खून केला आहे. आरोपी हा स्वतः यवत पोलीस स्टेशन हद्दीत हजर झाला आहे. यवत पोलीस ठाण्यात हजर होऊन त्याने आपण पत्नीचा खून केला अशी माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर यवत पोलिसांनी हडपसर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. हडपसर पोलिसांनी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन पाहणी केली असता. महिलेचा मृतदेह सापडला. प्रथमदर्शनी गळा दाबून खून केला असावा असा अंदाज पोलिसांना आहे. कारण या मुलीच्या अंगावर इतर कुठेही मारहाणीच्या खुणा नाहीत. हडपसर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.