पाषाण-सूस रस्त्यावर अपघात; संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू

By नितीश गोवंडे | Updated: February 26, 2024 15:11 IST2024-02-26T15:11:14+5:302024-02-26T15:11:50+5:30

तरुणीचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली

accidents on pashan soos roads The death of a young computer engineer | पाषाण-सूस रस्त्यावर अपघात; संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू

पाषाण-सूस रस्त्यावर अपघात; संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू

पुणे : पाषाण-सूस रस्त्यावर झालेल्या अपघातात मोटारचालक संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तरुणीचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कीर्ती कृष्णा माळवे (४०, रा. इस्टीका सोसायटी, बाणेर) असे मृत्युमुखी पडलेल्या संगणक अभियंता तरुणीचे नाव आहे. अपघातात मोटारचालक अभिक चॅटर्जी (२४, रा. पाषाण-सूस रस्ता) जखमी झाले आहेत. कीर्ती एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला होत्या. चॅटर्जी एका व्यायामशाळेत प्रशिक्षक आहेत. मोटारचालक कीर्ती रात्री नऊच्या सुमारास पाषाण-सूस रस्त्याने निघाल्या होत्या. वरदायिनी सोसायटीसमोर मोटारचालक कीर्ती यांचे नियंत्रण सुटले. तेथून मोटारचालक चॅटर्जी निघाले होते. चॅटर्जी यांच्या मोटारीवर पाठीमागून भरधाव मोटार आदळली. अपघातात मोटारचालक कीर्ती गंभीर जखमी झाल्या. मोटारचालक चॅटर्जी जखमी झाले. गंभीर जखमी अवस्थेतील कीर्ती यांना खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पाेलिस उपनिरीक्षक शामल पाटील यांनी दिली, पुढील तपास त्या करत आहेत.

Web Title: accidents on pashan soos roads The death of a young computer engineer