दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; एकाने गमावला जीव, दुसरा गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 09:56 IST2023-01-13T09:55:38+5:302023-01-13T09:56:30+5:30

दुचाकीचालकाचा तोल जाऊन तो खाली पडला आणि त्याचवेळी पाठीमागून येणारा टेम्पो त्याच्या डोक्यावरून गेला

Accidents due to loss of control of two wheeler One killed the village the other seriously injured | दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; एकाने गमावला जीव, दुसरा गंभीर जखमी

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; एकाने गमावला जीव, दुसरा गंभीर जखमी

वारजे : वारजेत डुक्कर खिंडीजवळ दुचाकीचालकाचा तोल जाऊन तो खाली पडला आणि त्याचवेळी पाठीमागून येणारी टेम्पोने त्यांना चिरडले. त्यामध्ये चालक मुलगा जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेला गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

बाळू लालू मेघावत (१८, संजय गांधी वसाहत, लमाण तांडा, पाषाण) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळू व त्याचा साथीदार असे दोघे एका दुचाकीने (क्र. एमएच १२ एनएस ६९९३) महामार्गाने संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास वारजेकडून चांदणी चौकाच्या दिशेने जात होते.  त्याची दुचाकी डुक्कर खिंडीजवळ अनियंत्रित होऊन खाली पडली. मागून येणाऱ्या आयशर टेम्पोची त्याला धडक बसून त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.  असावा, अशी शक्यता आहे. तर दूर फेकल्या गेलेल्या त्याच्या मित्राला गंभीर जखमी अवस्थेत मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Accidents due to loss of control of two wheeler One killed the village the other seriously injured