Accident: पुणे - नगर महामार्गावरील अपघातात कंटेनरखाली दबून मायलेकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 20:12 IST2021-10-17T20:11:52+5:302021-10-17T20:12:14+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे पुणे - नगर महामार्गावर भरधाव कंटनेर दुचाकीवर उलटल्याने कंटेनरखाली दबून झालेल्या अपघातात राळेगण सिद्धी ता. पारनेर येथील आई व मुलाचा मृत्यू झाला आहे.

Accident: पुणे - नगर महामार्गावरील अपघातात कंटेनरखाली दबून मायलेकाचा मृत्यू
शिरूर : श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे पुणे - नगर महामार्गावर भरधाव कंटनेर दुचाकीवर उलटल्याने कंटेनरखाली दबून झालेल्या अपघातात राळेगण सिद्धी ता. पारनेर येथील आई व मुलाचा मृत्यू झाला आहे.
रविवारी सकाळी शिरूरवरून दुचाकीवर स्वप्नील बाळू मापारी ( वय २७ ) व त्यांची आई लक्ष्मीबाई बाळू मापारी ( वय ६२ ) हे राळेगण सिद्धीला घरी चालले होते. पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा कंटेनर दुभाजक तोडून नगर रोडवर पलटी झाला. त्याचवेळेस कंटेनर थेट त्यांच्या अंगावरच पलटी झाल्याने मायलेक कंटेनरखाली दबले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले. मन हेलावणारे दृश्य पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी आले. बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मारुती कोळप, पोलीस हवालदार भाऊसाहेब शिंदे, पोलीस काँन्स्टेबल संपत गुंड हे घटनास्थळी दाखल होऊन कंटेनर बाजूला काढून मृतदेह बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला.
सुखी संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला
स्वप्नील यांचा दिड वर्षापूर्वी विवाह झाला होता. सुखी संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला. नेहमी कष्ट करणारे मापारी कुटुंबातील स्वप्नील व त्यांची आई यांचे निधन झाल्याने संपूर्ण राळेगण सिद्धी परिवारावर शोककळा पसरली आहे.