मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 23:49 IST2018-11-01T23:47:41+5:302018-11-01T23:49:46+5:30
भरधाव कारची कंटेनरला जोरदार धडक

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
लोणावळा : मुंबईपुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ झालेल्या भीषण अपघातात मावळ तालुक्यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या महिंद्रा एक्सयूव्ही 500 कारनं (एमएच 14 डीजे 1800) या कंटेनरला मागून जोरात धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. रवी बबन ठोंबरे (वय 24) व अक्षय शांताराम दाभाडे (वय 22) अशी अपघातात मृत पावलेल्यांची नावं आहेत. हे दोघेही मावळ तालुक्यातल्या कामशेतचे रहिवासी होते. या अपघातात चरन ठाकार (26), कनैय्या सोरटे (वय 26, दोघेही राहणार तळेगाव दाभाडे) व सचिन वाळूंज (वय 31, रा. बऊर कामशेत) हे तीन जण जखमी झाले आहेत.