युगंधर ताजणे लोकमत न्युज नेटवर्क पुणे -मुंबई एक्सप्रेस वे वर भरधाव वेगाने वाहने हाकणा-या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. नियमांकडे दुर्लक्ष करुन बेदरकारपणे वाहने चालविणा-या 65% कार आणि ट्रक चालक ठरवून दिलेल्या वेग मयार्देचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून आले आहे. तर या द्रुतगती मार्गावर पुढे आणि मागे बसणारे 42.3% प्रवासी हे सीट बेल्टच वापरत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सेव्ह लाईफ फाऊंडेशन या संस्थेने 2018 दरम्यान केलेल्या सर्वेक्षणातून अपघात व उपाययोजना याविषयी अनेक बाजुंचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. या सर्वेक्षणाकरिता सर्व प्रकारच्या वाहनांमधील 800 प्रवाशांचा अभ्यास करण्यात आला. त्यात प्रवाशांच्या तसेच तातडीच्या वाहनांमधील (पोलीस आणि रुग्णवाहिका) अधिकारी यांच्याही द्रुतगती मार्गावरील प्रवाशांच्या वर्तुणकीकडे लक्ष वेधणा-या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावरील रस्ते सुरक्षा सुधारण्याकरिता रात्रीच्या वेळी अपघात घडल्यानंतर तातडीने मदतीच्या उपाययोजना पोहचणे गरजेचे असल्याचे मत 53.3% प्रवाशांनी व्यक्त केले आहे. सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार एक्सप्रेस वे वर ताशी 80 किमी एवढी वेगमयार्दा निश्चित केली आहे. मात्र 65 % वाहनचालक कार आणि ट्रकचालक या नियमाचे उल्लंघन करताना आढळुन आले आहे. तसेच चालक किंवा प्रवासी अशा दोन्ही विभागात मोडणा-या 18 ते 25 वयोगटातील 46 % तरुण प्रवाशांनी सीट बेल्ट लावत नसल्याचे मान्य केले आहे.
वेग मर्यादेचे उल्लंघन एक्सप्रेस वे वर ठरतेय जीवघेणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 16:23 IST
पुणे -मुंबई एक्सप्रेस वे वर भरधाव वेगाने वाहने हाकणा-या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
वेग मर्यादेचे उल्लंघन एक्सप्रेस वे वर ठरतेय जीवघेणे
ठळक मुद्देमृत्युचे प्रमाण कमी हवी प्रभावी उपाययोजना सव्ह लाईफ फाऊंडेशनचा अभ्यास अहवालपुणे -मुंबई एक्सप्रेस वे वर भरधाव वेगाने वाहने हाकणा-या वाहनांमुळे अपघाताचा धोका या सर्वेक्षणाकरिता सर्व प्रकारच्या वाहनांमधील 800 प्रवाशांचा अभ्यास द्रुतगती मार्गावरील प्रवाशांच्या वर्तुणकीकडे लक्ष वेधणा-या प्रत्यक्ष मुलाखतीवैद्यकीय उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा गरज