शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
3
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
4
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
5
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
6
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
7
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
8
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
9
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
10
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
11
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
12
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
13
Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
14
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
15
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
17
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
18
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
19
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
20
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:24 IST

Maharashtra Nagar Parishad and Nagar Panchayat Election 2025 Date: मतदान केंद्रनिहाय याद्या ७ नोव्हेंबरला प्रकाशित होईल. १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार आहेत असं त्यांनी सांगितले. 

Maharashtra Local Body Election 2025 Date: सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२५ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी यासाठी मतदान होईल तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीत १ कोटीहून अधिक मतदार मतदान करतील. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मशीन आणि बॅलेट युनिट वापरण्यात येतील अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. 

याबाबत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात येत आहे. ६८५९ सदस्य यातून निवडून येणार आहे. १४७ नगरपंचायती आहेत त्यापैकी ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. नगरपंचायतीत एका प्रभागात २ जागा असतात. उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील. एका उमेदवाराला जास्तीत जास्त ४ प्रभागात अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. जर एखाद्याने जातवैधतेसाठी अर्ज केला असेल तर त्याची पावती लागेल. मतदान केंद्रनिहाय याद्या ७ नोव्हेंबरला प्रकाशित होईल. १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार आहेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच कोकण विभाग - २७, नाशिक - ५९, पुणे - ६०, नागपूर - ५५ अशा नगरपरिषदा,नगरपंचायतीच्या निवडणुका होतील. १३ हजार ३५५ मतदान केंद्रावर ही निवडणूक होईल. २८८ अध्यक्षपद, ३८२० प्रभाग, ६८५९ सदस्य यासाठी ही निवडणूक होणार आहे. मतदान केंद्रातील इमारतीत मोबाईल नेता येईल परंतु मुख्य कक्षात मोबाईल नेता येणार नाही. ६६ हजार निवडणूक अधिकारी, कर्मचारी यासाठी काम करत आहेत अशी माहितीही दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.

असा आहे कार्यक्रम (Maharashtra Local Body Election 2025 Date)

१० नोव्हेंबर २०२५ - उमेदवारी अर्ज दाखल करणे२१ नोव्हेंबर २०२५ - उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीखमतदानाचा दिवस - २ डिसेंबर २०२५मतमोजणी - ३ डिसेंबर २०२५

दुबार मतदारांसाठी नवीन मोहिम

दुबार मतदारांपर्यंत राज्य निवडणूक आयोगाचे कर्मचारी पोहचतील. मतदारांना मतदान केंद्रे आणि नाव शोधण्यासाठी खास APP बनवण्यात आले आहे. दुबार मतदारांसमोर डबल स्टार करण्यात आलेले आहेत. असा मतदार केंद्रावर आल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल. त्याला एकाच केंद्रावर मतदान करता येईल असं दिनेश वाघमारे यांनी म्हटलं.  

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Local Body Elections Announced: Dates, Details, and Measures for Duplicate Voters

Web Summary : Maharashtra State Election Commission announced elections for 246 Nagar Parishads and 42 Nagar Panchayats. Voting is on December 2, 2025, and counting on December 3, 2025. Measures are in place to address duplicate voters, including an app and affidavits.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकMaharashtraमहाराष्ट्र