पुण्यात होळीच्या कार्यक्रमावेळी दुर्घटना; लाईटचा गर्डर कोसळून १५ तरुण-तरुणी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 17:30 IST2026-03-03T17:29:00+5:302026-03-03T17:30:50+5:30
गर्डर पडून जखमी झालेल्यांपैकी चौघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे

पुण्यात होळीच्या कार्यक्रमावेळी दुर्घटना; लाईटचा गर्डर कोसळून १५ तरुण-तरुणी जखमी
पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्क मुंढवा रोडवर रॉयर फार्ममध्ये होळीच्या कार्यक्रमात लाईटचा गर्डर पडून १५ ते १६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहत होळी साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी होळीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेय. दरम्यान पुण्यात होळीच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, होळीनिमित्त कोरेगाव पार्क-मुंढवा रोडवर रॉयर फार्ममध्ये एका भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एका खासगी कंपनीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी एक हजार पेक्षा जास्त तरुण तरुणींनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात अचानक लाइटचा गर्डर कोसळून दुर्घटना घडली आहे. गर्डर काही तरुणांच्या अंगावर पडल्यानं १५ ते १६ जण जखमी झाले आहेत. यात तरुण तरुणींचा समावेश आहे. गर्डर पडून जखमी झालेल्यांपैकी चौघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तर एकाची प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती समोर येत आहे. याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.