Pune Bike Accident : महिलेच्या अंगावरून ट्रकच चाक गेलं,जागीच मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:17 IST2025-06-11T15:15:23+5:302025-06-11T15:17:02+5:30
गंगाधाम चौकात आल्या नंतर सिग्नल सुटल्यावर पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक देत पुढे फरफटत नेले यामध्ये महिले च्या अंगावरून ट्रक चे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला

Pune Bike Accident : महिलेच्या अंगावरून ट्रकच चाक गेलं,जागीच मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी
बिबवेवाडी : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हि घटना मार्केट यार्ड मधील गंगाधाम चौकात आज (१ १ जून ) बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दिपाली सोनी वय २९ असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून दुचाकीस्वार जगदीश पन्नालाल सोनी वय ६१ वर्ष असं जखमीचे नाव आहे. या अपघात प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी ट्रक चालक शौकत अली पापालाल कुलकुंडी (वय 51 राहणार भवानी पेठ ) यास ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड गंगाधाम या अत्यंत रहदारीच्या मार्गावरुन जगदीश आणि दीपाली दोघेजण दुचाकीवरून जात होते. गंगाधाम चौकात आल्या नंतर सिग्नल सुटल्यावर पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक देत पुढे फरफटत नेले यामध्ये महिलेच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार पन्नालाल हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पन्नालालला रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, गंगाधाम चौकात कायम अपघात होत असतात. अपघात झाला की तात्पुरती जड वाहनांना बंदी घालण्यात येते. गंगाधाम चौकाकडे जाणाऱ्या बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर पायाभूत सुविधांची वानवा आहे. महापालिकेने 'आई माता मंदिर' आणि गंगाधाम चौक दरम्यानच्या उतारात बदल करण्याची योजना जाहीर केली आहे. हा उतार कमी करून स्पीड बंप आणि रॅम्बल स्ट्रिप्स बसवले जात आहेत. रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमणे हटविली गेली पाहिजेत. या रस्त्यावर दिवसा जड वाहनांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी अतुल जैन व अमोल परदेशी यांनी केली आहे.