Video: तब्बल ४८ तासांपासून फरार; गाडेचा शिरूरमध्ये शोध सुरु, पोलिसांसोबतच श्वानपथक तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:56 IST2025-02-27T15:52:47+5:302025-02-27T15:56:29+5:30
आरोपी याच परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे

Video: तब्बल ४८ तासांपासून फरार; गाडेचा शिरूरमध्ये शोध सुरु, पोलिसांसोबतच श्वानपथक तैनात
पुणे : स्वारगेट घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे शिरूरच्या साळुंखे फार्म हाऊस परिसरात लपून बसल्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. बलात्काराच्या घटनेनंतर गाडे हा फार्र झाला आहे. पुणे, शिरूर पोलिसांची पथके त्याच शोध घेत आहेत. अशातच तो शिरूरच्या या फार्म हाऊस परिसरात लपून बसला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याच शोध सुरु आहे.
पोलिसांसोबतच श्वानपथक देखील आरोपीच्या शोधासाठी तैनात आहेत. तब्बल 48 तासापासून पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपी गाडे थेट जन्मगाव असलेल्या शिरूर तालुक्यातील गुणाट गाव परिसरात आल्याची माहिती समोर आली आहे. इतकच नाही तर आरोपी याच परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची ही शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी श्वान पथक बोलावले असून त्या मार्फत आरोपीचा शोध घेतला जातोय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची आठ ते दहा पथके आरोपीच्या मागावर आहेत. आरोपी दत्तात्रय गाडेच्या गावाला छावणीचे स्वरूप आल्याचे दिसते आहे.
तब्बल ४८ तासांपासून फरार; गाडेचा शिरूरमध्ये शोध सुरु, पोलिसांसोबतच श्वानपथक तैनात#Pune#shirur#Police#Crimepic.twitter.com/sFkCBou5x8
— Lokmat (@lokmat) February 27, 2025
गाडे सराईत गुन्हेगाराने परगावी निघालेल्या एका तरुणीला धमकावून शिवशाही बसमध्ये तिच्यावर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात मंगळवारी सकाळी घडली. त्याच्याविरूद्ध यापूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे ग्रामीण पोलिसांत दाखल आहेत. घटनेनंतर एवढा वेळ होऊनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला नसल्याने अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. राजकीय वर्तुळातूनही पोलिसांवर टिका होऊ लागली आहे. सध्या शिरूरच्या शेतात त्याचा शोध घेत आहेत. गाडेचा लवकरात लवकर शोघ घेणे पोलिसांसमोरील आव्हानच असल्याचे बोलले जात आहे.