डिव्हायडर वरून रस्ता ओलांडताना तरुणीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू; कोथरूड स्टॅन्डसमोरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 13:01 IST2024-10-09T12:37:03+5:302024-10-09T13:01:44+5:30
कोथरूड स्टॅन्ड समोर सिग्नलवरून मुलगी पायी चालत असताना डिव्हायडर वरून रस्ता ओलांडत होती

डिव्हायडर वरून रस्ता ओलांडताना तरुणीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू; कोथरूड स्टॅन्डसमोरील घटना
कोथरूड : कर्वे रस्त्यावरील कोथरूड स्टॅन्ड समोर २३ वर्षीय तरुणीचा अपघातीमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना सकाळी साडे अकरा च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातमृत्यू झालेली मुलगी मुळची अमरावती येथील आहे. आरती सुरेश मनवाने (वय 23 रा. एरंडे होस्टेल भेलके नगर कोथरूड) ही कोकण एक्सप्रेस हॉटेल येथून कर्वे रोडने डिव्हायडर वरून रोड क्रॉस करत होती डंपरची धडक लागून जागीच मृत्यू झाला. तिचे वडील सुरेश मनवाणी यांना कळवले असून डंपर ताब्यात घेतला आहे. कोथरूड स्टॅन्ड समोर सिग्नलवरून मुलगी पायी चालत असताना डिव्हायडर वरून रस्ता ओलांडत होती. त्यावेळी मिक्सर डंपर समोर आल्याने ती चाकाखाली गेली. या घटनेत मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. मिक्सर चालक यांनी या घटनेप्रसंगी पळ काढला आहे. या घटनेचा अधिक तपास अलंकार पोलीस करत आहेत.