Video: पुण्यातील सिंहगड रस्त्यावर भरदिवसा तरुणावर कोयत्याने सपासप वार करून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 10:42 AM2022-03-24T10:42:30+5:302022-03-24T10:43:58+5:30

दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

A young man was stabbed to death on Sinhagad road in Pune all day long | Video: पुण्यातील सिंहगड रस्त्यावर भरदिवसा तरुणावर कोयत्याने सपासप वार करून खून

Video: पुण्यातील सिंहगड रस्त्यावर भरदिवसा तरुणावर कोयत्याने सपासप वार करून खून

googlenewsNext

धायरी : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ एका तरुणाची पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार करुन हत्या केली आहे. मारुती लक्ष्मण ढेबे (वय २३ वर्षे, सध्या रा. वारजे, मूळ रा. धनगरवस्ती नांदेड ता. हवेली.) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मारुती ढेबे हा नांदेड फाट्यापासून नांदेड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानात बसलेला होता. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर अचानक कोयत्याने हल्ला केला. या टोळक्याने मारुती ढेबेवर कोयत्याने सपासप वार केले. त्यात ढेबे यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर हल्लेखोर कारने पसार झाले. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. वर्दळीचा रस्ता तसेच सायंकाळची वेळ असल्याने हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये या घटनेमुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, सहाय्यक फौजदार प्रदीप नांदे, पोलीस हवालदार रामदास बाबर, निलेश राणे, पोलीस नाईक अशोक गिरे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलीसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असून याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना हवेली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली आहेत.

Web Title: A young man was stabbed to death on Sinhagad road in Pune all day long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.