व्हाट्स अँपवर स्टेट्स ठेवला, गळा चिरला, बीडच्या तरुणानं संपवलं जीवन; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:56 IST2025-05-12T16:55:41+5:302025-05-12T16:56:13+5:30
तरुण आत्महत्या प्रयत्न करणार आहे, त्याने त्याच्या मोबाईल वरून व्हाट्सअप द्वारे सुसाईड नोट पाठवली असल्याचे घरच्यांनी कंट्रोल रूमला सांगितले होते

व्हाट्स अँपवर स्टेट्स ठेवला, गळा चिरला, बीडच्या तरुणानं संपवलं जीवन; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे: पुण्यात एका वीस वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलत थेट आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली. विद्यार्थ्याने चक्क सार्वजनिक शौचालयात आत्महत्या केली. हा विद्यार्थी मूळ बीडच्या भाग्यनगर परिसरात राहणारा होता. तो aims bhopal येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता. आणि फेस्टिव्हल गेम्ससाठी तो AFMC college पुण्यात आला होता. याच दरम्यान त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. धक्कादायक म्हणजे त्याने WhatsApp status ठेवत हे केल्याने या घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
तरुणाचे नाव उत्कर्ष महादेव शिंगणे असं आहे. तो वैद्यकीय शिक्षण भोपाळाला घेत होता.आत्महत्येपूर्वी त्याने व्हाट्स अँप स्टेट्सवर सुसाईड नोट ठेवली. आणि सार्वजनिक शौचालयात स्वतःचा गळा कापून जीवन संपवलं. ही घटना पुण्यातील वानवडी भागात आठ मे रोजी घडली असून वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
उत्कर्षचा शोध घेतला असता कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहाच्या बाथरूममध्ये त्याचा मृतदेह सापडला. तो कमोडवर बसलेले आढळून आला. शेजारीच रक्त आणि चाकू पडलेला होता. चाकू त्याने ऑनलाईन अँप वरून मागवलेला असल्याची माहिती आता समोर आली आहे. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं असून घटनास्थळी पोलीस अधिक तपास करतायेत. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करीत आहेत. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी पंचनामा मृतदेह ताब्यात घेतला असून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलं आहे. तरुणाने आत्महत्या का केली? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय होते सुसाईड नोटमध्ये
‘मी उत्कर्ष शिंगणे भोपाळमधील ‘एआयआयएमएस’ संस्थेत शिक्षण घेत आहे. अभ्यासाचा ताण, तसेच नैराश्यामुळे मी स्वखुशीने आत्महत्या करत आहे. मी शिक्षण मंत्र्यांना विनंती करत आहे. अभ्यासक्रमात मुघल, फ्रेंच, रशियन इतिहासाचा समावेश करू नये. त्याऐवजी अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचा समावेश करावा’, असे उत्कर्षने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे.